1
प्रक. 8:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला, तेव्हा सुमारे अर्ध्या तासापर्यंत स्वर्गात शांतता होती.
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रक. 8:1
2
प्रक. 8:7
पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच रक्तमिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले.
एक्सप्लोर करा प्रक. 8:7
3
प्रक. 8:13
आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता; आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की, जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!
एक्सप्लोर करा प्रक. 8:13
4
प्रक. 8:8
दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले.
एक्सप्लोर करा प्रक. 8:8
5
प्रक. 8:10-11
तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला; त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते.
एक्सप्लोर करा प्रक. 8:10-11
6
प्रक. 8:12
चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही.
एक्सप्लोर करा प्रक. 8:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ