1
1 तीमथ्य 6:12
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
श्रद्धेचे सुयुद्ध लढत रहा. स्वतःसाठी शाश्वत जीवन मिळव. त्यासाठीच तुला पाचारण करण्यात आले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तुझी श्रद्धा जाहीरपणे स्वीकारली आहेस.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:12
2
1 तीमथ्य 6:10
कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या मागे लागून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ दुःखांनी त्यांची हृदये विदीर्ण करून घेतली आहेत.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:10
3
1 तीमथ्य 6:6
समाधानी धार्मिक जीवन हा एक महान लाभ असतो.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:6
4
1 तीमथ्य 6:7
आपण जगात काही आणले नाही आणि निश्चितच आपल्याला त्यातून काही नेता येत नाही!
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:7
5
1 तीमथ्य 6:17
प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, त्यांनी गर्विष्ठ होऊ नये, चंचल धनावर भिस्त ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर भिस्त ठेवावी.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:17
6
1 तीमथ्य 6:9
परंतु जे धनवान होऊ पाहतात, ते मोहपाशात सापडून मूर्खपणाच्या बाधक वासनांत अडकून स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतात
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:9
7
1 तीमथ्य 6:18-19
चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. अशा प्रकारे ते असा काही साठा जमवितील की, तो त्यांच्या भवितव्यासाठी भरभक्कम पाया ठरेल व त्यामुळे ते खरे शाश्वत जीवन मिळवू शकतील.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:18-19
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ