ह्या लोकांकडे जाऊन सांग की,
‘तुम्ही ऐकाल तर खरे,
परंतु तुम्हांला समजणार नाही
व पाहाल तर खरे,
परंतु तुम्हांला आकलन होणार नाही.
कारण ह्या लोकांचे अंतःकरण
जड झाले आहे.
ते कानांनी मंद ऐकतात
आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत,
ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
कानांनी ऐकू नये,
मनाने समजू नये,
त्यांचे परिवर्तन होऊ नये
आणि मी त्यांना बरे करू नये’.