1
1 तीमथ्य 6:12
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
विश्वासाचे सुयुद्ध लढ. परमेश्वराने तुला केलेले पाचारण आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव, ज्याचा अनेक साक्षीदारांसमक्ष तू अंगीकार केला आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:12
2
1 तीमथ्य 6:10
कारण पैशाचा लोभ सर्वप्रकारच्या दुष्टाईचे एक मूळ होय. पैशाच्या आसक्तीने कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस अनेक दुःखांनी भेदून घेतले आहे.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:10
3
1 तीमथ्य 6:6
परंतु संतोषासहित असणारी सुभक्ती ही मोठीच मिळकत आहे.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:6
4
1 तीमथ्य 6:7
कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:7
5
1 तीमथ्य 6:17
जगातील श्रीमंतांना निक्षून सांग की त्यांनी गर्विष्ठ आणि उद्धट होऊ नये; त्या धनावर विसंबून राहू नये. तर परमेश्वर जे आपल्या उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतात, त्याचा अभिमान बाळगा व त्यांच्यावर भरवसा ठेवा.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:17
6
1 तीमथ्य 6:9
जे श्रीमंत होण्याची इच्छा धरतात, ते परीक्षेत आणि पाशात व अति मूर्खपणाच्या आणि अपायकारक अभिलाषांच्या आहारी जातात, जी त्यांना अधोगतीला नेऊन त्यांचा संपूर्ण नाश करतात.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:9
7
1 तीमथ्य 6:18-19
त्यांना चांगले ते करण्यासाठी, सत्कर्माविषयी धनवान व गरजवंतांना औदार्याने देणे व परोपकारी असण्याविषयी आज्ञा द्या. अशाप्रकारे, ही संपत्ती त्यांच्या भावी युगाच्या पायाभरणीसाठी खर्च केली जाईल, जेणेकरून जे जीवन जगू शकतील ते वास्तव आहे.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 6:18-19
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ