1
उपदेशक 9:10
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जे काम तुझ्या हाताला सापडते, ते तुझ्या सर्व शक्तीने कर, कारण मृतलोकामध्ये, जिथे तुला जायचे आहे, तिथे ना काम आहे, ना योजना, ना विद्या, ना सुज्ञान.
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 9:10
2
उपदेशक 9:11
मी सूर्याखाली आणखी काहीतरी वेगळे पाहिले: शर्यत वेगवानांसाठी नाही, किंवा युद्ध बलवानाचे नाही, सुज्ञानी लोकांनाच भोजन मिळते असे नाही किंवा बुद्धिमानाला धन मिळते असे ही नाही किंवा कुशल कारागिरांवरच अनुग्रह होईल, असे नाही; परंतु समय व प्रसंग सर्वांनाच येतो.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:11
3
उपदेशक 9:9
सूर्याखाली परमेश्वराने तुला देऊ केलेल्या अर्थहीन जीवनाच्या आपल्या सर्व दिवसांत आपली पत्नी, जिच्यावर तू प्रेम करतो, तिच्याबरोबर या निरर्थक जीवनाचा आनंद उपभोग. कारण सूर्याखाली तुझ्या जीवनाचा व श्रमाचा हाच वाटा आहे.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:9
4
उपदेशक 9:7
जा, आनंदाने तुझे भोजन कर, आणि हर्षित हृदयाने आपला द्राक्षारस पी, कारण तू जे करतो ते परमेश्वराने आधी मान्य केले आहे.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:7
5
उपदेशक 9:18
युद्धाच्या शस्त्रांपेक्षा सुज्ञान बरे, पण एक पापी पुष्कळ चांगल्या गोष्टींचा नाश करतो.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:18
6
उपदेशक 9:17
सुज्ञानी मनुष्याच्या शांत शब्दांकडे लक्ष देणे हे मूर्खांच्या राजाचे ओरडणे ऐकण्यापेक्षा बरे.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:17
7
उपदेशक 9:5
जिवंतांना आपण मरणार हे माहीत असते, पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते; त्यांना पुढे काही मोबदला नाही आणि त्यांच्या नावाचे सुद्धा स्मरण नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 9:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ