इजिप्त देशातील प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र मरण पावेल, फारोह जो राजासनावर बसतो त्याच्या प्रथम पुत्रापासून त्याच्या जात्यावर दळत बसणार्या गुलाम स्त्रीच्या प्रथम पुत्रापर्यंत आणि जनावरातील प्रथम जन्मलेले प्रत्येक वत्स मरेल. संपूर्ण इजिप्त देशभर पूर्वी कधी झाला नाही व पुढे कधी होणार नाही असा आकांत होईल.