मग याहवेह मोशेला म्हणाले, “खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्तमधून बाहेर आणलेस, ते भ्रष्ट झाले आहेत. मी त्यांना दिलेल्या आज्ञांपासून ते फार लवकरच फिरले आहेत आणि आपल्यासाठी वासराची ओतीव मूर्ती तयार केली आहे. त्यांनी त्याच्यासमोर नमन केले आहे आणि यज्ञ करून म्हटले आहे, ‘हे इस्राएला, ही तुमची दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले आहे!’ ”