1
यहेज्केल 18:32
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
कारण कोणाच्याही मरणाने मला आनंद होत नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. पश्चात्ताप करा आणि जिवंत राहा!
तुलना करा
एक्सप्लोर करा यहेज्केल 18:32
2
यहेज्केल 18:20
जो पाप करतो तोच मरेल. आपल्या आईवडिलांचा दोष त्यांची संतती वाहणार नाही किंवा आईवडील आपल्या संततीचा दोष वाहणार नाहीत. नीतिमानाचे नीतिमत्व त्यांच्यासाठी मोजले जाईल आणि दुष्टाची दुष्टता त्यांच्याविरुद्ध मोजली जाईल.
एक्सप्लोर करा यहेज्केल 18:20
3
यहेज्केल 18:31
तुम्ही केलेले सर्व अपराध दूर टाकून द्या आणि नवीन हृदय व नवीन आत्मा घ्या. इस्राएल लोकहो, तुम्ही का मरावे?
एक्सप्लोर करा यहेज्केल 18:31
4
यहेज्केल 18:23
दुष्टाच्या मरणात मी आनंद पावतो काय? परंतु आपल्या मार्गापासून वळून ते जीवन जगतात त्यात मी संतुष्ट नाही काय? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
एक्सप्लोर करा यहेज्केल 18:23
5
यहेज्केल 18:21
“पण जर एखादा दुष्ट मनुष्य त्याने केलेल्या सर्व पापांपासून मागे फिरला आणि माझ्या सर्व विधींचे पालन केले आणि जे न्याय्य व योग्य ते केले, तो व्यक्ती खचित जगेल; तो मरणार नाही.
एक्सप्लोर करा यहेज्केल 18:21
6
यहेज्केल 18:9
तो माझे विधी पाळतो आणि विश्वासूपणे माझे नियम राखतो. तो मनुष्य न्यायी आहे; तो निश्चित जगेल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
एक्सप्लोर करा यहेज्केल 18:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ