याहवेह असे म्हणतात:
“जो मनुष्यावर विश्वास ठेवतो,
जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो
आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो.
तो मनुष्य वैराण वाळवंटातील खुरट्या झुडूपासारखा आहे;
उन्नतीचे चांगले दिवस त्यांना कधीच दिसणार नाहीत.
ते वाळवंटातील उजाड भूमीमध्ये,
ज्या क्षारभूमीत जीवन नसेल, तिथे राहतील.