“तू गंधसरूचा जास्तीत जास्त वापर केला तर
ते तुला राजा बनविल काय?
तुझा पिता खातपीत नव्हता काय?
त्याने जे योग्य आणि न्याय्य केले,
म्हणून त्याचे सर्व चांगलेच झाले.
त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले,
म्हणून त्याचे सर्व भले झाले.
मला जाणून घेणे म्हणजे हेच नाही काय?”
असे याहवेह म्हणतात.