तुझ्या शब्दांनी अडखळलेल्यांना आधार दिला आहे;
आणि लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेस.
परंतु आता तुझ्यावर संकट आले आणि तू निराश झालास;
तुझ्यावर आघात झाला आणि तू भयभीत झालास.
तुझी भक्ती हा तुझा आत्मविश्वास नसावा काय
आणि तुझे निर्दोष मार्ग तुझी आशा असू नयेत काय?