येशू एका गावात असता एक कुष्ठरोगाने भरलेला माणूस तेथे आला. त्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, जर तुमची इच्छा आहे, तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”
येशूंनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हणाले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो!” आणि तत्क्षणी त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला.