२ इतिहास 21
21
यहूदाचा राजा यहोराम ह्याची कारकीर्द
(२ राजे 8:16-24)
1यहोशाफाट हा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्याच्या पूर्वजांमध्ये दावीदपुरात मूठमाती देण्यात आली, त्याचा पुत्र यहोराम त्याच्या जागी राजा झाला.
2त्याचे भाऊ यहोशाफाटाचे पुत्र हे होत : अजर्या, यहीएल, जखर्या, अजर्या, मीखाएल व शफाट्या, हे सर्व इस्राएलाचा राजा यहोशाफाट ह्याचे पुत्र होत.
3त्यांच्या बापाने त्यांना सोने, रुपे व अमूल्य वस्तू ह्यांच्या मोठ्या देणग्या दिल्या आणि यहूदातील तटबंदीची नगरे दिली; पण यहोरामास त्याने राज्य दिले, कारण तोच ज्येष्ठ पुत्र होता.
4यहोराम आपल्या बापाच्या गादीवर कायम होऊन बलाढ्य झाला, तेव्हा त्याने आपल्या सर्व भावांना व इस्राएलाच्या काही सरदारांना तलवारीने वधले.
5यहोराम बत्तीस वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत आठ वर्षे राज्य केले.
6अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलाच्या राजांच्या रीतीप्रमाणे तो चालला; त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
7तथापि जो करार परमेश्वराने दाविदाशी केला होता त्यामुळे आणि त्याने त्याचा व त्याच्या वंशजांचा दीप सर्वकाळ राहील असे वचन दिले होते त्यामुळे तो दाविदाचे घराणे नाहीसे करीना.
8त्याच्या कारकिर्दीत अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून देऊन आपला राजा नेमला.
9तेव्हा यहोराम आपले सेनानायक व आपले सर्व रथ बरोबर घेऊन तिकडे गेला. ज्या अदोमी लोकांनी त्याला घेरले होते त्यांना व रथांच्या नायकांना त्याने रात्रीच्या वेळी उठून मार दिला.
10अदोमाने यहूदाचे स्वामीत्व झुगारून दिले; ते आजवर तसेच आहे. ह्याच सुमारास लिब्नाने त्याचे स्वामित्व झुगारून दिले; त्याने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला सोडले होते म्हणून असे झाले.
11त्याने आणखी यहूदाच्या पहाडांवर उच्च स्थाने बांधली आणि यरुशलेमेतल्या रहिवाशांना व्यभिचारी मतीने चालायला लावून यहूदास बहकवले.
12एलीया संदेष्ट्याकडून त्याला एक लेख आला तो असा : “तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू आपला बाप यहोशाफाट ह्याच्याप्रमाणे व यहूदाचा राजा आसा ह्याच्याप्रमाणे चालला नाहीस;
13तर इस्राएलाच्या राजाप्रमाणे चाललास आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे यहूदी व यरुशलेमनिवासी ह्यांना व्यभिचारी मतीने चालायला लावले, त्याचप्रमाणे तुझ्याहून चांगले असे जे तुझ्या बापाच्या घराण्यातील तुझे भाऊबंद त्यांचा तू वध केलास;
14ह्यामुळे पाहा, तुझे लोक, तुझी मुलेबाळे, तुझ्या स्त्रिया व तुझे सर्व धन ह्यांवर परमेश्वर मोठा प्रहार करील;
15तू आतड्यांच्या रोगाने बहुत पीडा पावशील; तो रोग इतका वाढेल की त्यामुळे दिवसानुदिवस तुझी आतडी गळून पडतील.”’
16परमेश्वराने पलिष्टी व कूशी लोकांच्या शेजारचे अरबी लोक ह्यांची मने क्षुब्ध करून त्यांना यहोरामावर उठवले;
17ते यहूदावर स्वारी करून त्यात घुसले आणि राजमंदिरात जितकी संपत्ती मिळाली तितकी सर्व आणि राजपुत्र व राजस्त्रिया ही अवघी त्यांनी नेली; त्याचा कनिष्ठ पुत्र यहोआहाज1 ह्याच्याखेरीज त्याच्याजवळ कोणी पुत्र राहिला नाही.
18ह्यानंतर परमेश्वराने त्याच्या आतड्यांना असाध्य रोगाची पीडा लावली.
19उत्तरोत्तर त्या रोगामुळे त्याची आतडी गळत गेली आणि तो अत्यंत पीडा भोगून दोन वर्षांच्या अंती मरण पावला. त्याच्या वाडवडिलांसाठी लोकांनी जशी धूपद्रव्ये जाळली होती तशी त्याच्यासाठी मुळीच जाळली नाहीत.
20तो राज्य करू लागला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता; त्याने आठ वर्षे यरुशलेमेत राज्य केले; तो सर्वांना अप्रिय होऊन मरण पावला; त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, पण ती राजांच्या थडग्यांत दिली नाही.
सध्या निवडलेले:
२ इतिहास 21: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: