YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 22

22
यहूदाचा राजा अहज्या ह्याची कारकीर्द
(२ राजे 8:25-29)
1यरुशलेमकरांनी त्याच्या जागी त्याचा कनिष्ठ पुत्र अहज्या2 ह्याला राजा केले, कारण जी माणसांची टोळी अरबी लोकांबरोबर छावणीत आली होती तिने त्याच्या सर्व थोरल्या मुलांचा वध केला होता. ह्या प्रकारे अहज्या बिन यहोराम हा यहूद्यांचा राजा झाला.
2अहज्या राज्य करू लागला तेव्हा तो बेचाळीस1 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या; ही अम्रीची नात.
3त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, कारण दुष्कृत्ये करण्यास त्याची आई त्याला सल्ला देत असे.
4अहाबाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर त्या घराण्यातील लोकांनी त्याला असा सल्ला दिला की त्यायोगे त्याचा नाश झाला.
5तो त्यांच्या मसलतीने इस्राएलाचा राजा यहोराम बिन अहाब ह्याच्याबरोबर रामोथ-गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल ह्याच्याशी लढायला गेला, तेव्हा अरामी लोकांनी योरामास घायाळ केले.
6तो हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्याला झाले होते ते बरे व्हावेत म्हणून तो इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र यहोराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता म्हणून यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अजर्‍या2 त्याच्या समाचारास गेला.
येहू अहज्यास ठार मारतो
(२ राजे 9:27-29)
7अहज्याचा नाश देवाकडून झाला, कारण त्याने योरामाची संगत धरली होती; अहाबाच्या घराण्याचा उच्छेद करावा म्हणून परमेश्वराने येहू बिन निमशी ह्याला अभिषिक्त केले होते; त्याच्याशी सामना करावा म्हणून तो तेथे येऊन यहोरामाबरोबर निघाला होता.
8येहू अहाबाच्या घराण्यास शासन करीत असता यहूदाचे सरदार व अहज्याचे पुतणे हे अहज्याच्या सेवेस असलेले त्याला आढळले; तेव्हा त्याने त्यांचा वध केला.
9त्याने अहज्याचा शोध लावला; त्याला त्याच्या लोकांनी पकडले; तो शोमरोन येथे लपून राहिला होता; त्यांनी त्याला येहूकडे नेऊन त्याचा वध केला. त्याला मूठमाती दिली; ते म्हणाले, “जो यहोशाफाट परमेश्वराला जिवेभावे शरण गेला त्याचा हा पुत्र.” अहज्याच्या घराण्यात राज्य करण्यास समर्थ असा कोणी उरला नाही.
अथल्या राजासन हिरावून घेते
(२ राजे 11:1-20)
10अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला.
11तरी राजकन्या यहोशबाथ3 हिने अहज्याचा पुत्र योवाश ह्याला त्या वधायच्या राजपुत्रांतून चोरून नेले आणि बिछाने ठेवण्याच्या कोठडीत त्याच्या दाईने त्याला लपवून ठेवले. ह्याप्रमाणे यहोराम राजाची कन्या जी यहोयादा याजकाची पत्नी यहोशबाथ (जी अहज्याची बहीण होती) तिने योवाशाला अथल्येपासून लपवले म्हणून तिला त्याचा वध करता आला नाही.
12देवाच्या मंदिरात त्याला त्यांच्याबरोबर सहा वर्षे लपवून ठेवले होते; तेव्हा अथल्येने देशावर राज्य केले.

सध्या निवडलेले:

२ इतिहास 22: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन