२ इतिहास 27
27
योथामाची कारकीर्द
(२ राजे 15:32-38)
1योथाम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरूशा असे होते; ती सादोकाची कन्या.
2परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले; त्याचा बाप उज्जीया ह्याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला; मात्र परमेश्वराच्या मंदिरात त्याने प्रवेश केला नाही. प्रजाजन अधिकाधिक बिघडत चालले.
3त्याने परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा बांधला आणि ओफेलच्या कोटावर पुष्कळ बांधकाम केले.
4त्याने यहूदाच्या पहाडी देशात शहरे वसवली आणि वनात गढ्या व बुरूज बांधले.
5त्याने अम्मोनी लोकांच्या राजाशी लढून त्यांच्यावर वर्चस्व मिळवले त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर किक्कार चांदी, दहा हजार कोर गहू, दहा हजार कोर जव अशी खंडणी दिली. दुसर्या व तिसर्या वर्षीही अम्मोनी लोकांनी अशीच खंडणी दिली.
6योथाम आपला देव परमेश्वर ह्याला स्मरून आपली वर्तणूक ठेवी म्हणून तो समर्थ झाला.
7योथामाची अवशिष्ट कृत्ये, त्याच्या सर्व लढाया व त्याचे वर्तन हे सर्व इस्राएल व यहूदी ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे.
8तो राज्य करू लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता व यरुशलेमेत त्याने सोळा वर्षे राज्य केले.
9योथाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात मूठमाती दिली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आहाज हा राजा झाला.
सध्या निवडलेले:
२ इतिहास 27: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.