यहेज्केल 19
19
इस्राएलाच्या सरदारांसाठी विलाप
1आता तू इस्राएलाच्या सरदारांसाठी विलाप कर,
2आणि असे म्हण, ‘तुझी आई कोण? ती सिंहीण होती, ती सिंहांमध्ये वसत होती; तिने तरुण सिंहामध्ये आपल्या पेट्यांचे संगोपन केले.
3तिने आपल्या पेट्यांपैकी एकाला वाढवले; तो वाढून तरुण सिंह झाला व शिकार करण्यास शिकला; तो माणसे भक्षू लागला.
4राष्ट्रांनी त्याच्याविषयी ऐकले; त्यांनी केलेल्या खाचेत तो अडकून पडला; त्यांनी त्याला वेसण घालून मिसर देशात नेले.
5आपली आशा भग्न होऊन नष्ट झाली हे तिने पाहिले तेव्हा तिने आपला दुसरा एक पेटा घेऊन त्याला वाढवले आणि तारुण्यावस्थेत आणले.
6तो सिंहांमध्ये हिंडूफिरू लागला, तरुण सिंह झाला व शिकार करण्यास शिकला; तो माणसांना भक्षू लागला.
7त्याने त्यांचे वाडे उद्ध्वस्त केले व त्यांची नगरे उजाड केली; त्याच्या गर्जनेच्या शब्दाने देश व त्यातील सर्वकाही वैराण बनले.
8सभोवतालच्या निरनिराळ्या प्रांतांतील राष्ट्रे त्याच्यावर उठली; त्यांनी त्याच्यावर आपले जाळे टाकले; त्यांनी केलेल्या खाचेत तो अडकून पडला.
9त्यांनी त्याला वेसण घालून पिंजर्यात कोंडले व बाबेलच्या राजाकडे नेले; इस्राएलाच्या डोंगरावर त्याचा शब्द पुन्हा ऐकू येऊ नये म्हणून त्याला दुर्गात टाकले.
10तुझी आई तुझ्या द्राक्षमळ्यात जलाजवळ लावलेल्या द्राक्षवेलीसारखी होती; जलाच्या विपुलतेने ती सफळ होऊन तिला पुष्कळ पांगोरे फुटले.
11अधिपतीची राजवेत्रे होण्याजोगे तिला मजबूत धुमारे आले; ती उंच वाढून तिने मेघांना भेदले व तिच्या बहुत शाखांसहित ती उंचीने मोठी दिसत होती.
12तेव्हा तिच्यावर क्रोध होऊन तिला उपटून जमिनीवर पाडण्यात आले; पूर्वेकडील वार्यामुळे तिची फळे करपली; तिचे मजबूत धुमारे मोडून वाळून गेले; अग्नीने खाक केले.
13आता तिला रानात रुक्ष व निर्जल प्रदेशात लावले आहे.
14तिच्या शाखांतील धुमार्यातून अग्नी निघून त्याने तिची फळे खाऊन टाकली आहेत; आता अधिकार चालवण्याचा राजदंड होण्याजोगा तिच्यावर मजबूत धुमारा एकही राहिला नाही.’ हे विलापगीत आहे व विलापासाठी राहील.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 19: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: