यहेज्केल 20
20
इस्राएलाशी देवाचा व्यवहार
1सातव्या वर्षी पाचव्या महिन्यात दशमीस असे झाले की इस्राएलाचे काही वडील प्रश्न विचारण्यासाठी येऊन माझ्यासमोर बसले.
2तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
3“मानवपुत्रा, इस्राएलाच्या वडिलांबरोबर बोल; त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही मला प्रश्न विचारण्यास आलात काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हांला मला प्रश्न विचारू देणार नाही.
4तू त्यांचा न्याय करू नये काय? मानवपुत्रा, तू त्यांचा न्याय करू नये काय? त्यांना त्यांच्या वडिलांची अमंगळ कृत्ये विदित कर.
5त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या दिवशी मी इस्राएलास निवडून घेतले, याकोब वंशाकडे मी हात उचलून शपथ वाहिली, मिसर देशात त्यांना मी प्रकट झालो, हात उचलून त्यांना शपथपूर्वक म्हणालो की, मी परमेश्वर तुमचा देव आहे.
6त्या दिवशी मी हात उचलून त्यांच्याबरोबर शपथ केली की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा तुमच्यासाठी पाहिलेल्या देशात आणीन; तो देश सर्व देशांचा मुकुटमणी होय.
7तेव्हा मी त्यांना म्हटले, तुम्ही सर्वांनी आपल्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू फेकून द्याव्यात व मिसर देशाच्या मूर्तींनी आपणांस विटाळ होऊ देऊ नये; मी परमेश्वर तुमचा देव आहे.
8तरीपण ते माझ्याशी फितूर झाले व माझे ऐकेनात; त्यांच्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू त्यांच्यातील कोणी फेकून दिल्या नाहीत; मिसर देशाच्या मूर्तीही सोडून दिल्या नाहीत; तेव्हा मिसर देशात त्यांच्यावर माझ्या क्रोधाची वृष्टी करावी, त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले.
9तथापि माझ्या नामासाठी, ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा, म्हणून मी हे कार्य केले; मी त्यांना मिसर देशातून काढून त्या राष्ट्रांच्यादेखत त्यांना प्रकट झालो.
10मी त्यांना मिसर देशातून काढून रानात आणले.
11मी त्यांना आपले नियम लावून दिले, माझे निर्णय त्यांना दाखवून दिले; हे जो कोणी पाळील तो त्यायोगे वाचेल.
12आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यास मी त्यांना आपले शब्बाथही दिले; ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यांना पवित्र केले हे त्यांना समजावे.
13तरीपण रानात इस्राएल घराणे मला फितूर झाले. ज्यांच्या पालनाने मनुष्य वाचतो, त्या माझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत, माझे निर्णय त्यांनी टाकून दिले व माझे शब्बाथ फार भ्रष्ट केले; तेव्हा रानात त्यांच्यावर आपल्या क्रोधाची वृष्टी करून त्यांचा नाश करावा असे मी म्हटले.
14तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यांना बाहेर आणले त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून माझ्या नामासाठी मी अशी कृती केली.
15आणखी मी हात उचलून रानात अशी शपथ घेतली की दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत व जो सर्व देशांचा मुकुटमणी आहे असा देश मी त्यांना दिला होता, त्यात मी त्यांना आणणार नाही;
16कारण त्यांचे अंतःकरण त्यांच्या मूर्तींशी जडल्यामुळे त्यांनी माझे निर्णय टाकून दिले, ते माझ्या नियमांप्रमाणे चालले नाहीत, व त्यांनी माझे शब्बाथ भ्रष्ट केले.
17तरी मी त्यांच्यावर कृपादृष्टी करून त्यांची गय केली, रानात त्यांचा नाश केला नाही, त्यांचा पूर्ण शेवट केला नाही.
18तसेच रानात मी त्यांच्या वंशजांना म्हणालो, तुम्ही आपल्या वडिलांच्या नियमांप्रमाणे चालू नका, त्यांच्या निर्णयांना अनुसरू नका, व त्यांच्या मूर्तींनी आपणांस विटाळू नका.
19मी परमेश्वर तुमचा देव आहे; माझ्या नियमांना अनुसरून चाला, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे वागा;
20माझे शब्बाथ पवित्र माना, म्हणजे ते तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होतील व तुम्हांला समजेल की मी परमेश्वर तुमचा देव आहे.
21तरीपण ते वंशजही मला फितूर झाले; जे पाळल्याने मनुष्य वाचतो त्या माझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत; ते माझे निर्णय त्यांनी टाकून दिले; माझे शब्बाथ त्यांनी भ्रष्ट केले; तेव्हा रानात त्यांच्यावर आपल्या क्रोधाची वृष्टी करून त्यांच्यावर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले.
22तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यांना बाहेर आणले त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून मी आपला हात आवरला; माझ्या नामासाठी अशी कृती मी केली.
23आणखी त्यांची राष्ट्रांमध्ये पांगापांग करीन व त्यांना देशोधडीस लावीन अशी प्रतिज्ञाही मी रानात हात उचलून केली;
24कारण त्यांनी माझे निर्णय पाळले नाहीत; माझे नियम टाकून दिले, माझे शब्बाथ भ्रष्ट केले, व त्यांचे डोळे त्यांच्या वडिलांच्या मूर्तींकडे लागले.
25तेव्हा जे चांगले नाहीत असे नियम मी त्यांना दिले, ज्यांनी ते जगायचे नाहीत असे निर्णय त्यांना दिले.
26मी त्यांची नासधूस केल्याने त्यांना असे समजावे की मी परमेश्वर आहे; मी त्यांना त्यांच्या यज्ञार्पणासंबंधाने असे भ्रष्ट केले की त्यांनी गर्भाशयातून प्रथम निघालेल्यांचा अग्नीत होम केला.
27ह्यास्तव हे मानवपुत्रा, इस्राएल घराण्याबरोबर बोल, आणि हे सांग; प्रभू परमेश्वर असे म्हणतो, आणखी तुमच्या पूर्वजांनी माझ्याबरोबर विश्वासघात करून माझा अपमान केला, तो असा;
28मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पण केले; तेथे संतापवण्याजोगी अर्पणे त्यांनी केली; तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली.
29तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुम्ही ज्या उंचवट्यावर जाता तो कसला आहे? आजवर त्याला बामा (उंचवटा) असे म्हणत आले आहेत.
30ह्याकरता इस्राएल घराण्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, काय? तुम्ही आपल्या वडिलांच्या मार्गास लागून आपणांस विटाळवता व अनाचार करून त्यांच्या अमंगळ वस्तूंच्या मागे लागता,
31आणि आपली अर्पणे वाहून व आपल्या पुत्रांचा अग्नीत होम करून आपल्या सर्व मूर्तींच्या योगे आजवर आपणांस विटाळवत आहात; असे असता मी तुम्हांला मला प्रश्न विचारू देईन काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हांला मला प्रश्न विचारू देणार नाहीच.
32तुम्ही म्हणता ‘राष्ट्रांप्रमाणे, देशोदेशीच्या लोकांप्रमाणे आम्ही काष्ठपाषाणाची पूजा करू,’ हे जे तुमच्या मनात तरंग उठतात ते सिद्धीस जाणार नाहीत.
33प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी प्रबल बाहूने, उगारलेल्या हाताने व कोपवृष्टी करून तुमच्यावर राज्य करीन.
34मी प्रबल बाहूने, उगारलेल्या हाताने व कोपवृष्टी करून तुम्हांला राष्ट्रांतून आणीन, ज्या देशात तुमची पांगापांग झाली आहे त्यांतून तुम्हांला एकत्र करीन;
35आणि मी तुम्हांला राष्ट्रांच्या रानात आणून तेथे तुमच्याबरोबर समक्ष वाद करीन.
36मी मिसर देशाच्या रानात तुमच्या वडिलांबरोबर वाद केला तसा तुमच्याबरोबर वाद करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
37तुम्हांला काठीखालून चालवून कराराने बद्ध करीन;
38बंडखोर व माझ्याबरोबर फितुरी करणारे ह्यांना मी तुमच्यापासून वेगळे करीन; ते अल्पकाळ वस्ती करून आहेत त्या देशांतून त्यांना बाहेर नेईन; पण इस्राएल देशात त्यांचे येणे होणार नाही, म्हणजे तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
39ह्यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे इस्राएल घराण्या, जा, आपल्या हव्या त्या मूर्तीची पूजा कर; पण पुढे तुम्ही खरोखर माझे ऐकाल, आणि आपल्या अर्पणांनी व मूर्तींनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावणार नाही.
40तर माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलाच्या उंच पर्वतावर, इस्राएलाचे सर्व घराणे, त्यातले सगळे जण आपल्या देशात माझी सेवा करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो; तेथे मी त्यांचा अंगीकार करीन; तेथे तुमच्याजवळ अर्पणे, तुमची श्रेष्ठ अर्पणे, समर्पित केलेल्या सर्व वस्तू मी मागेन.
41मी तुम्हांला राष्ट्रांतून बाहेर आणीन व ज्या देशांत तुमची पांगापांग झाली आहे त्यांतून तुम्हांला जमा करीन, तेव्हा मी सुगंधाप्रमाणे तुमचा स्वीकार करीन आणि तुमच्या ठायी माझी पवित्रता विदेशी राष्ट्रांना प्रकट होईल.
42जो इस्राएल देश मी हात उचलून तुमच्या वडिलांना दिला त्यात मी तुम्हांला आणीन तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
43ज्या तुमच्या मार्गांनी व ज्या तुमच्या सर्व कर्मांनी तुम्ही आपणांस विटाळले, त्यांचे स्मरण तुम्हांला होईल व तुम्ही जी सर्व दुष्कर्मे केली त्यामुळे तुम्ही स्वतःचा वीट मानाल.
44हे इस्राएल घराण्या, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्या कुमार्गाप्रमाणे, तुमच्या भ्रष्ट कृत्यांप्रमाणे नव्हे, तर माझ्या नामासाठी मी तुमच्यात कृती करीन, तेव्हा तुम्हांला समजेल की, मी परमेश्वर आहे.”
दक्षिणेविरुद्ध भविष्यवाणी
45परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की,
46“मानवपुत्रा, दक्षिणेकडे आपले तोंड कर, दक्षिणेकडे आपल्या वाणीचा ओघ वाहू दे आणि दक्षिणेच्या मैदानांतील वनाविषयी संदेश दे.
47दक्षिणेतील वनास सांग, परमेश्वराचे वचन ऐक; प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुझ्यात अग्नी पेटवीन, तो तुझ्यातले प्रत्येक हिरवे झाड व प्रत्येक शुष्क झाड भस्म करील; धगधगणारी ज्वाळा विझायची नाही आणि तिच्या योगे दक्षिणोत्तर सर्व मुखे पोळतील.
48मी परमेश्वराने तो अग्नी पेटवला आहे असे सर्व मानव समजतील; तो विझायचा नाही.”
49मी म्हणालो, “अहा! प्रभू परमेश्वरा! लोक माझ्याविषयी म्हणतात, ‘हा दृष्टान्त सांगणारा नव्हे काय?”’
सध्या निवडलेले:
यहेज्केल 20: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: