यहेज्केल 21
21
परमेश्वराची तीक्ष्ण तलवार
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, यरुशलेमेकडे आपले तोंड कर, पवित्रस्थानाकडे आपल्या वाणीचा ओघ वाहू दे व इस्राएल देशाविरुद्ध संदेश दे;
3इस्राएल देशास सांग, परमेश्वर असे म्हणतो की पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे, मी आपली तलवार म्यानातून उपसून तुझ्यातले नीतिमान व दुष्कर्मी ह्यांना छेदून टाकीन.
4मी तुझ्यातले नीतिमान व दुष्कर्मी ह्यांना छेदून टाकणार, ह्यास्तव माझी तलवार म्यानातून निघून दक्षिणोत्तर सर्व मानवजातीवर चालेल;
5तेव्हा सर्व मानवजातीला समजेल की मी परमेश्वराने आपली तलवार म्यानातून उपसली आहे; ती पुन्हा त्यात परत जाणार नाही.
6ह्यास्तव हे मानवपुत्रा, कंबर मोडेल असा उसासा टाक, त्यांच्यासमक्ष कष्टाने उसासा टाक
7आणि ‘उसासा का टाकतोस?’ असे तुला कोणी विचारतील तेव्हा त्यांना सांग की, ‘ही वार्ता प्रत्ययास येत आहे म्हणून; तेव्हा सर्वांची मने खचतील, सर्वांचे हात निर्बल होतील, सर्वांचा उत्साह विरेल, सर्वांच्या गुडघ्यांचे पाणी होईल; पाहा, ती प्रत्ययास येत आहे, तिच्याप्रमाणे खास घडेल,”’ असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
8परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
9“मानवपुत्रा, संदेश देऊन सांग; परमेश्वर असे म्हणतो, तलवार, पाणी दिलेली, पाजवलेली तलवार!
10वध करावा म्हणून तिला पाणी दिले आहे, ती विजेप्रमाणे चमकावी म्हणून ती पाजवली आहे! माझ्या पुत्राचे राजवेत्र सर्व राजदंडांना तुच्छ लेखते, असे म्हणून आपण आनंद करावा काय?
11ती हाती धरावी म्हणून पाजवण्यास दिली आहे; तलवार वध करणार्याच्या हाती द्यावी म्हणून तिला पाणी दिले आहे, ती पाजवली आहे.
12मानवपुत्रा, ओरड, आक्रंदन कर; कारण ती माझ्या लोकांवर चालली आहे, ती इस्राएलांच्या सर्व सरदारांवर चालली आहे; माझ्या लोकांबरोबर तेही तलवारीने पडले आहेत, म्हणून आपले ऊर बडव.1
13कारण त्याला कसोटीस लावले आहे; आणि तुच्छ मानणारे राजवेत्र टिकले नाही तर कसे?” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
14“मानवपुत्रा, तू संदेश देऊन टाळी वाजव म्हणजे तलवारीस, भोसकणार्या तलवारीस, तिप्पट जोर येईल; त्यांना घेरणारी तलवार थोरांनाही भोसकणारी होईल.
15त्यांचे हृदय गलित व्हावे, व त्यांचे पाय पराकाष्ठेचे लटपटावेत म्हणून मी त्यांच्या सर्व वेशींवर घात करणारी तलवार चालवली आहे; अहो! ती विजेप्रमाणे चमकावी असे तिला केले आहे, ती वधासाठी उपसली आहे.
16अगे तलवारी, तुझे मुख जसे फिरेल तशी तू सावरून उजवीकडे वळ, डावीकडे फीर.
17मीही टाळी वाजवून आपल्या क्रोधाची पूर्तता करीन; मी परमेश्वर हे म्हणतो.”
18परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की,
19“मानवपुत्रा, बाबेलच्या राजाची तलवार येण्याकरता दोन रस्ते आखून काढ; ते दोन्ही रस्ते एकाच देशातून निघावेत; नगरात जाणार्या रस्त्याच्या चवाठ्यावर मार्गदर्शक हाताची एक आकृती खोदून काढ.
20अम्मोनपुत्रांचा राब्बा ह्याच्यावर तलवार येण्याचा एक रस्ता आणि यहूदात जाऊन तटबंदी केलेल्या यरुशलेमेवर तलवार येण्याचा एक रस्ता आखून काढ.
21कारण बाबेलचा राजा चवाठ्यावर, दोन रस्ते फुटतात तेथे शकुन पाहण्यासाठी थांबला आहे; तो भात्यांतले बाण हलवून प्रश्न पाहत आहे, तेराफीमांना1 कौल लावत आहे, यज्ञपशूच्या काळजावरून शकुन पाहत आहे.
22त्याच्या उजव्या बाजूस यरुशलेमेविषयी शकुन निघाला; तो असा की आघातयंत्रे लावावीत, ‘मारा! हाणा!’ असे शब्द तोंडातून काढावेत; सिंहनाद करावा, वेशींना आघातयंत्रे लावावीत; मोर्चे रचावेत व बुरूज बांधावेत.
23इस्राएलाच्या दृष्टीने हा शकुन खोटा आहे, कारण त्यांच्याजवळ देवाचे प्रतिज्ञापूर्वक करार आहेत; तरी तो त्यांना त्यांच्या अधर्माचे स्मरण देऊन परक्यांच्या स्वाधीन करतो.
24ह्यासाठी प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमचे अपराध उघडकीस येऊन तुमच्या सर्व कृत्यांत तुमची पातके दिसून येतात; येणेकरून तुम्हीच आपल्या स्वत:ला अधर्माचे स्मरण देता, तुमचे स्मरण झाले आहे म्हणून तुम्ही परक्यांच्या हाती सापडला आहात.
25हे जखमी झालेल्या पातक्या, इस्राएलाच्या सरदारा, तुझी घटका, तुझा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे;
26प्रभू परमेश्वर असे म्हणतो, शिरोभूषण उतरव. मुकुट काढून टाक; काहीच कायम राहणार नाही; जे नीच ते उंच होईल आणि जे उंच ते नीच होईल.
27मी त्याचा विध्वंस करीन, करीनच करीन; ही स्थिती अशीच राहायची नाही; ज्याचा हक्क आहे तो आल्यावर त्याला मी सत्ता देईन.
अम्मोन्यांचा न्याय
28हे मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, अम्मोनपुत्रांविषयी व त्यांनी केलेल्या निंदेविषयी प्रभू परमेश्वर जे म्हणतो ते सांग; तलवार, वधासाठी तलवार उपसली आहे, फन्ना उडवण्यासाठी, चमकण्यासाठी ती पाजवली आहे.
29ते तुझ्यापुढे कपटाचा संदेश देत असता, तुला खोटा शकुन सांगत असता, ज्या जखमी झालेल्या पातक्यांचा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे त्यांच्या कापलेल्या मानांवर ती तलवार तुला लोळवील.
30ती पुन्हा म्यानात घाल. जेथे तू निर्माण झालास त्या तुझ्या जन्मभूमीवर मी तुझा न्याय करीन.
31मी आपल्या कोपाचा वर्षाव तुझ्यावर करीन, माझ्या कोपाग्नीचा मी तुझ्यावर फुंकर घालीन आणि राक्षसी व नाश करण्यात कुशल अशा मनुष्यांच्या हाती मी तुला देईन.
32तू अग्नीला भक्ष्य होशील; तुझे रक्त देशात पडून राहील; तुझी पुढे आठवण राहणार नाही, कारण मी परमेश्वर हे बोललो आहे.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 21: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: