YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 12

12
मोशेने पराभूत केलेले राजे
1ज्या राजांना ठार मारून त्यांचे यार्देनेपलीकडे उगवतीकडील आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत असलेले प्रदेश आणि पूर्वेकडील सर्व इस्राएल लोकांनी काबीज केले ते राजे हे :
2अमोर्‍यांचा हेशबोननिवासी राजा सीहोन; आर्णोन खोर्‍याच्या कडेवरल्या अरोएर नगरापासून व त्याच खोर्‍याच्या मध्यापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत असलेल्या अर्ध्या गिलादावर,
3आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवरापासून बेथ-यशिमोथाच्या वाटेवरल्या अराबापर्यंत म्हणजे पूर्वेकडील अराबाच्या समुद्रापर्यंत किंवा क्षार समुद्रापर्यंत आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती;
4उरलेल्या रेफाई लोकांतला बाशानाचा राजा ओग; हा अष्टारोथ व एद्रई येथे राहत असे, 5आणि हर्मोन पर्वत, सलका, गशूरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंतचा सगळा बाशान प्रांत आणि हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत अर्ध्या गिलादावर त्याची सत्ता होती.
6ह्यांचा मोड परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी केला होता; आणि परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तो रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतन म्हणून दिला होता. यहोशवाने पराभूत केलेले राजे 7यार्देनेच्या पश्‍चिमेस लबानोन खोर्‍यातील बाल-गादापासून सेईरास जाणार्‍या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते व ज्यांचा यहोशवा व इस्राएल लोक ह्यांनी मोड केला ते हे : (हा देश यहोशवाने इस्राएलवंशांना त्यांच्या हिश्शांप्रमाणे वतन म्हणून दिला,
8तेथील डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.) 9यरीहोचा राजा, बेथेलाच्या बाजूस जे आय त्याचा राजा,
10यरुशलेमाचा राजा, हेब्रोनाचा राजा,
11यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा,
12एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा,
13दबीराचा राजा, गेदेराचा राजा,
14हर्माचा राजा, अरादाचा राजा,
15लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा,
16मक्केदाचा राजा, बेथेलाचा राजा,
17तप्पूहाचा राजा, हेफेराचा राजा,
18अफेकाचा राजा, लशारोनाचा राजा,
19मादोनाचा राजा, हासोराचा राजा,
20शिम्रोन-मरोनाचा राजा, अक्षाफाचा राजा,
21तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,
22केदेशाचा राजा, कर्मेलातील यकनामाचा राजा,
23नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल1 येथील गोयीमाचा2 राजा,
24तिरसाचा राजा; ह्याप्रमाणे नगरागणिक एक असे एकंदर एकतीस राजे होते.

सध्या निवडलेले:

यहोशवा 12: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन