लेवीय 10
10
नादाब आणि अबीहू ह्यांचे पातक
1अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यांत अग्नी घातला व त्यांवर धूप घालून तो अनधिकृत अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती.
2तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले.
3ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वराने सांगितले ते हे : जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझा गौरव होईल.” तेव्हा अहरोन चूप राहिला.
4मग अहरोनाचा चुलता उज्जीयेल ह्याचे मुलगे मीशाएल व एलसाफान ह्यांना मोशेने बोलावून सांगितले की, “तुम्ही इकडे येऊन तुमच्या बांधवांना पवित्रस्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”
5मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी येऊन त्यांच्या अंगरख्यांसहित त्यांना उचलून छावणीबाहेर नेले.
याजकांची कर्तव्ये आणि त्यांच्या जबाबदार्या
6मोशेने अहरोन आणि त्याचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका; तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल; पण त्याने जो अग्नी पेटवला त्याबद्दल तुमच्या बांधवांनी म्हणजे सगळ्या इस्राएल घराण्याने विलाप करावा.
7तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये; गेलात तर मराल; कारण परमेश्वराने विहित केलेल्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” त्यांनी मोशेच्या सांगण्याप्रमाणे केले.
8आणखी परमेश्वराने अहरोनाला सांगितले, 9“जेव्हा जेव्हा तुम्ही, म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शनमंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल; हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय;
10ह्या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य, अशुद्ध व शुद्ध ह्यांमधील भेद जाणावा;
11आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना कळवलेले सर्व विधी तुम्ही इस्राएल लोकांना शिकवावेत.”
12मग मोशेने अहरोनाला व त्याचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या हव्यांपैकी उरलेले अन्नार्पण घेऊन वेदीजवळ खमिरावाचून खा, कारण ते परमपवित्र आहे;
13ते तुम्ही पवित्र स्थळी खावे, कारण परमेश्वराच्या हव्यांपैकी तो तुझा हक्क व तुझ्या मुलांचा हक्क आहे; मला अशीच आज्ञा झाली आहे.
14ओवाळलेला ऊर आणि समर्पित केलेली मांडी ही तुम्ही, म्हणजे तू व तुझ्यासहित तुझे मुलगे व मुली ह्यांनी एखाद्या स्वच्छ स्थळी खावी; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी तुला व तुझ्या मुलाबाळांना ती हक्क म्हणून दिली आहेत.
15समर्पणाची मांडी व ओवाळणीचा ऊर ही चरबीच्या हव्यांसहित ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळण्या-साठी आणावी; हा तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलाबाळांचा निरंतरचा हक्क आहे, अशी परमेश्वराची आज्ञा आहे.”
16मोशेने पापार्पणाच्या बकर्याची बारकाईने विचारपूस केली असता त्याला कळले की, तो जाळून टाकला आहे; तेव्हा अहरोनाचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर रागावून तो म्हणाला,
17“तुम्ही पापार्पण पवित्रस्थानी का खाल्ले नाही? ते परमपवित्र आहे व मंडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे म्हणून ते तुम्हांला दिले आहे.
18पाहा, त्याचे रक्त पवित्रस्थानाच्या आत आणण्यात आले नाही; तुम्ही माझ्या आज्ञेप्रमाणे त्याचे मांस पवित्रस्थानी अवश्य खायचे होते.”
19मग अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण ही परमेश्वरासमोर अर्पण केली आहेत, तरी माझ्यावर अशा आपत्ती ओढवल्या आहेत; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर ते परमेश्वराच्या दृष्टीने योग्य झाले असते काय?”
20हे ऐकून मोशेचे समाधान झाले.
सध्या निवडलेले:
लेवीय 10: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: