लेवीय 9
9
अहरोनाने केलेली अर्पणे
1आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे आणि इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले;
2आणि त्याने अहरोनाला सांगितले, ‘पापार्पणासाठी एक दोषहीन गोर्हा व होमार्पणासाठी एक दोषहीन मेंढा घेऊन परमेश्वरासमोर अर्पण कर;
3आणि इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा, आणि होमार्पणासाठी एक गोर्हा व एक कोकरू आणा, ही दोन्ही एका वर्षाची व दोषहीन असावीत;
4आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी एक बैल, एक मेंढा आणि तेलात मळलेले अन्नार्पण आणा, कारण आज परमेश्वर तुम्हांला दर्शन देणार आहे.”
5मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दाराजवळ आणले आणि सर्व मंडळी जवळ येऊन परमेश्वरासमोर उभी राहिली.
6तेव्हा मोशे म्हणाला, “तुम्ही जे करावे म्हणून परमेश्वराने आज्ञा दिली ते हेच; आता परमेश्वराचे तेज तुमच्या दृष्टीस पडेल.”
7मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित्त घे; आणि लोकांकडचे बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे हे कर.”
8तेव्हा अहरोनाने वेदीजवळ जाऊन आपल्या पापार्पणाचा गोर्हा वधला.
9मग अहरोनाचे मुलगे त्याच्याकडे रक्त घेऊन गेले, तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले आणि ते वेदीच्या पायथ्याशी ओतले.
10पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील पडदा ह्यांचा त्याने वेदीवर होम केला. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.
11मांस व कातडे त्याने छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.
12मग त्याने होमबली वधला; व त्याचे रक्त अहरोनाच्या मुलांनी त्याला सादर केले; त्याने ते घेऊन वेदीवर चहूकडे शिंपडले.
13मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे करून एकेक तुकडा व त्याचे डोके ही त्याला सादर केली आणि त्यांचा त्याने वेदीवर होम केला.
14त्याने त्याची आतडी व पाय धुऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला.
15त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले आणि त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणे तोही पापार्पण म्हणून अर्पण केला;
16आणि त्याने होमबलीही जवळ नेऊन विधिपूर्वक अर्पण केला.
17मग त्याने अन्नार्पण जवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन त्याचा वेदीवर होम केला; सकाळच्या होमार्पणासह हेही अर्पण करण्यात आले.
18लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेले बैल आणि मेंढा हेही अहरोनाने वधले आणि त्याच्या मुलांनी त्यांचे रक्त त्याला सादर केले; ते त्याने वेदीवर सभोवती शिंपडले.
19त्यांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, मेंढ्याचे चरबीदार शेपूट, आतड्यांवर जे पसरलेले आहे ते, गुरदे आणि काळजावरील पडदा ही त्याला सादर केली;
20आणि त्यांनी चरबी त्या बलींच्या उरांवर ठेवली मग तिचा वेदीवर होम केला.
21तथापि ऊर आणि उजवी मांडी ही मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोनाने परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.
22मग अहरोनाने लोकांकडे वळून हात उंचावून त्यांना आशीर्वाद दिला आणि जेथे त्याने पापार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून उतरून तो खाली आला.
23नंतर मोशे व अहरोन दर्शनमंडपात गेले व बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला, तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांच्या दृष्टीस पडले.
24आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
सध्या निवडलेले:
लेवीय 9: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: