लेवीय 14
14
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“महारोग्यास शुद्ध ठरवण्याच्या वेळचा नियम हा : त्याला याजकाकडे आणावे;
3याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्यास तपासून पाहावे, व त्याच्या अंगावरचा महारोगाचा चट्टा बरा झाला असल्यास 4त्याने आज्ञा करावी की, ज्याला शुद्ध ठरवायचे आहे त्याच्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब1 हे घेऊन यावे;
5मग याजकाने आज्ञा करावी की, वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यांतला एक पक्षी मारावा;
6आणि जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब1 हे घेऊन जिवंत पक्ष्यासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात त्याने बुडवावे;
7आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवायच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगून त्या जिवंत पक्ष्याला माळरानात सोडून द्यावे;
8आणि शुद्ध ठरवायच्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडण करवावे आणि पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे.
9सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावेत; आपले कपडे धुवावेत व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल.
10आठव्या दिवशी दोन दोषहीन कोकरे, एक वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले तीन दशांश एफा2 सपीठ व एक लोगभर2 तेल हे आणावे.
11आणि शुद्ध ठरवणार्या याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्याला ह्या वस्तूंसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारी उभे करावे.
12मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरू आणि एक लोगभर तेल अर्पावे आणि ते परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळावे.
13आणि पवित्रस्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरू मारावे; कारण पापबलीप्रमाणेच दोषबलीवरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र होय.
14मग याजकाने दोषबलीचे थोडे रक्त घेऊन शुद्ध ठर-वायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला ते लावावे.
15याजकाने लोगभर तेलातले थोडेसे तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;
16मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले थोडे परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे.
17त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले थोडे घेऊन याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे;
18याजकाच्या तळहातावर उरलेले तेल त्याने शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि त्याच्यासाठी त्याने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे.
19मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्धतेपासून शुद्ध ठरवायच्या त्या मनुष्यासाठी प्रायश्चित्त करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा.
20याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
21तो गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसली तर त्याने आपल्या प्रायश्चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे, आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले एक दशांश एफा सपीठ आणि लोगभर तेल आणावे;
22आणि ऐपतीप्रमाणे दोन होले अथवा पारव्याची दोन पिले त्याने आणावीत; त्यांतील एक पापबली व एक होमबली व्हावा.
23आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने हे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.
24मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे.
25त्यानंतर दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे थोडे रक्त घेऊन शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे;
26याजकाने त्या तेलातले थोडे आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;
27मग त्याने आपल्या उजव्या हाताच्या बोटाने आपल्या डाव्या तळहातावरील थोडे तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे.
28मग याजकाने आपल्या तळहातावरील थोडे तेल घेऊन शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या अंगठ्यावर व उजव्या पायाच्या अंगठ्यावर दोषबलीचे रक्त लावलेल्या जागी लावावे;
29याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवायच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून लावावे.
30त्यानंतर त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे;
31त्याला जे पक्षी मिळाले असतील त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसर्याचे अन्नार्पणासहित होमार्पण करावे; ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे.
32अंगावर महारोगाचा चट्टा असलेल्या ज्या मनुष्याला आपल्या शुद्धीकरणाची सामग्री मिळवण्याची ऐपत नसेल त्याच्यासंबंधीचा हा नियम होय.”
33परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला,
34“जो कनान देश मी तुम्हांला वतन म्हणून देत आहे त्यात तुम्ही जाऊन पोहचाल तेव्हा तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला,
35तर ज्याचे ते घर असेल त्याने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काही दिसते.
36मग याजकाने आज्ञा करावी की, मी आत जाऊन चट्टा तपासण्यापूर्वी घर रिकामे करावे; नाहीतर घरातील सर्वच वस्तू अशुद्ध ठरायच्या. नंतर याजकाने आत जाऊन घर तपासावे.
37तो चट्टा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट अथवा तांबूस रेषा पडल्या असल्या आणि भिंतीत त्या खोलवर गेल्या असल्या,
38तर याजकाने घराबाहेर दाराशी यावे आणि ते घर सात दिवस बंद करून ठेवावे.
39मग सातव्या दिवशी याजकाने ते घर पुन्हा जाऊन तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतींवर पसरला असल्यास,
40याजकाने आज्ञा करावी की, चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावेत;
41आणि घर आतून सगळीकडून खरवडावे आणि खरवडून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध स्थळी टाकून द्यावा,
42आणि त्या दगडांच्या ऐवजी दुसरे दगड बसवावेत आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा.
43दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर जर पुन्हा तो चट्टा घरात उद्भवला,
44तर याजकाने आत येऊन तो तपासावा. घरात तो चट्टा पसरला असल्यास ते घराचे पसरत जाणारे कुष्ठ आहे; ते अशुद्ध होय.
45मग त्याने ते घर खणून पाडावे; त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावा.
46आणि घर बंद असताना कोणी त्यात शिरला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा;
47आणि कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावेत, त्याचप्रमाणे त्या घरात कोणी काही खाल्ले तर त्यानेही आपले कपडे धुवावेत.
48याजकाने आत जाऊन घर तपासावे आणि घराला गिलावा केल्यावर चट्टा परत उद्भवला नसला, तर त्याचा तो चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे.
49त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब हे त्याने आणावे;
50त्याने एक पक्षी वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा;
51मग त्याने गंधसरूचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात आणि वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे;
52त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी रंगाचे कापड ह्यांच्या योगे त्याने ते घर शुद्ध करावे.
53मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर माळरानात सोडून द्यावा; ह्या प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित्त केले म्हणजे ते शुद्ध ठरेल.”
54सर्व प्रकारच्या महारोगाचे चट्टे, चाई,
55कपड्यावरील अथवा घराचा महारोग,
56सूज, खवंद, तकतकीत डाग ह्या सर्वांसंबंधीचा हा नियम;
57ही केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे शिकवण्यासंबंधीचा हा महारोगाविषयीचा नियम होय.”
सध्या निवडलेले:
लेवीय 14: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: