लेवीय 15
15
शरीरातून वाहणारा अशुद्ध स्राव
1परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, 2“इस्राएल लोकांना सांगा की, एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्राव होत असल्यास त्या स्रावामुळे तो अशुद्ध होय.
3त्याचा शारीरिक स्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय, त्याच्या स्रावामुळे झालेल्या अशुद्धतेविषयीचा नियम हा : 4स्राव होणारा मनुष्य ज्या बिछान्यावर निजेल तो प्रत्येक अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय.
5जो त्याच्या बिछान्याला शिवेल त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
6स्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसला, तर त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
7स्राव होणार्या मनुष्याच्या अंगाला कोणी शिवला तर त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
8स्राव होणारा मनुष्य एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुंकला तर त्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
9स्राव होणारा मनुष्य ज्या वाहनाचा उपयोग करील ते अशुद्ध होय.
10त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तूला कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
11स्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता एखाद्याला शिवला, तर त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
12स्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला शिवला तर ते फोडून टाकावे; मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे.
13स्राव होणारा मनुष्य आपल्या स्रावापासून बरा झाल्यावर आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने मोजून सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले शरीर धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.
14आठव्या दिवशी त्याने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर जाऊन याजकाकडे ती द्यावीत;
15मग याजकाने त्यांतील एकाचे पापार्पण व दुसर्याचे होमार्पण करावे आणि त्याच्या स्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे.
16एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
17ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे.
18स्त्रीशी संभोग करताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करून संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
19एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे;
20ती दूर असेपर्यंत ज्यावर ती निजेल ते अशुद्ध होय; तसेच ज्यावर ती बसेल तेही अशुद्ध होय.
21जो कोणी तिच्या अंथरुणाला शिवेल त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
22ती ज्यावर बसली असेल त्याला जो कोणी शिवेल त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
23तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्याला शिवणार्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
24तिच्याशी संभोग करताना पुरुषाला तिचा विटाळ लागला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे व ज्या अंथरुणावर तो निजेल तेही अशुद्ध समजावे.
25एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असला अथवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली, तर तिचे स्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसांप्रमाणे समजावेत. ती अशुद्ध होय.
26ती ऋतुमती असेल तितके सगळे दिवस ती ज्या अंथरुणावर निजेल ते तिच्या विटाळाचे अंथरूण समजावे; त्याचप्रमाणे ती ज्यावर बसेल ते तिच्या ऋतुकालाच्या विटाळाप्रमाणे अशुद्ध समजावे.
27जो कोणी त्या वस्तूंना शिवेल तो अशुद्ध होय. त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
28पण त्या स्त्रीने आपल्या स्रावापासून शुद्ध झाल्यावर मोजून सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध ठरेल.
29आठव्या दिवशी तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे जावे.
30मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्याचे होमार्पण करावे आणि तिच्या स्रावाच्या अशुद्धतेमुळे तिच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे.
31ह्या प्रकारे तुम्ही इस्राएल लोकांना त्यांच्या अशुद्धतेपासून दूर ठेवावे म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले माझे निवासस्थान ते भ्रष्ट करणार नाहीत, आणि आपल्या अशुद्धावस्थेत मरायचे नाहीत.”
32स्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो,
33अथवा जी स्त्री ऋतुमती होते, तसेच ज्या पुरुषाला अथवा स्त्रीला स्राव होतो आणि जो कोणी पुरुष ऋतुमती स्त्रीशी संभोग करतो त्यांच्यासंबंधीचा हा नियम.
सध्या निवडलेले:
लेवीय 15: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: