लेवीय 17
17
अर्पणे करण्याचे एकमेव स्थळ
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“अहरोन, त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की, परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही : 3इस्राएल घराण्यातील एखाद्या माणसाने छावणीत किंवा छावणीबाहेर बकरा मारला, 4पण परमेश्वराच्या निवासमंडपासमोर परमेश्वराला अर्पण करायला तो दर्शनमंडपाच्या दाराशी आणला नाही, तर त्या माणसाला रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने रक्तपात केला म्हणून त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा;
5ह्याचा हेतू असा की, इस्राएल लोक जे आपले यज्ञपशू खुल्या मैदानात मारत असतात, ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणून परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणे म्हणून अर्पावेत.
6याजकाने त्यांचे रक्त दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराच्या वेदीवर शिंपडावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.
7आणि ह्यामुळे व्यभिचारी मतीने अजदैवतांच्या (बोकड) मागे लागून त्यांना त्यांनी आपले यज्ञपशू अर्पण करू नयेत; हा तुम्हांला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
8तू त्यांना सांग की, इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्या परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला, 9आणि तो पशू दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करण्यासाठी आणला नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.
रक्ताचे सेवन करणे वर्ज्य
10इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणार्या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन.
11शरीराचे जीवन तर रक्तात असते, आणि तुमच्या जिवांबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हांला दिले आहे; कारण रक्तात जीवन असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते.
12म्हणून मी इस्राएल लोकांना म्हटले आहे की, तुमच्यातील कोणी रक्त सेवन करू नये, आणि तुमच्यामध्ये राहणार्या परदेशीयांनीही रक्त सेवन करू नये.
13इस्राएल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्या परदेशीयांपैकी कोणी खाण्यालायक पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली, तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.
14कारण प्राणिमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन होय; ह्यास्तव इस्राएल लोकांना मी म्हटले आहे की, कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करू नये, कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच त्यांचे रक्त होय; ते जो कोणी सेवन करील त्याचा उच्छेद व्हावा.
15कोणा मनुष्याने, मग तो स्वदेशीय असो अथवा परदेशीय असो, मेलेल्या अथवा श्वापदांनी फाडून मारलेल्या पशूंचे मांस खाईल तर त्याने आपले कपडे धुऊन पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे म्हणजे तो शुद्ध होईल.
16त्याने आपले कपडे धुतले नाहीत व आपले शरीर धुतले नाही, तर त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी.”
सध्या निवडलेले:
लेवीय 17: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: