नीतिसूत्रे 17
17
1एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा.
2शहाणा सेवक लज्जा आणणार्या मुलावर हुकमत चालवील, व भाऊबंदांच्या वतनाचा विभागी होईल.
3रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखतो.
4दुष्कर्मी मनुष्य दुष्ट वाणी लक्ष देऊन ऐकतो; लबाड मनुष्य उपद्रवी जिव्हेला कान देतो.
5जो गरिबाची कुचेष्टा करतो तो त्याला उत्पन्न करणार्याचा अवमान करतो; जो दुसर्याच्या विपत्तीमुळे आनंद पावतो त्याला शिक्षा चुकणार नाही;
6पुत्रपौत्र वृद्धांचा मुकुट होत; मुलांची शोभा त्यांचे वडील होत;
7उत्कृष्ट बोलणे मूर्खाला शोभत नाही; मग खोटे बोलणे सरदारास कसे शोभेल?
8घेणार्याच्या दृष्टीने लाच रत्नासारखी मोलवान आहे; ज्या ज्या कामाकडे तो वळतो ते ते तो चातुर्याने करतो.
9जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो; पण जो गत गोष्टी घोकत बसतो त्याला मित्र अंतरतात.
10वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत.
11फितुरी मनुष्य केवळ बंड करू पाहतो, म्हणून त्याच्याकडे निर्दय जासूद पाठवण्यात येईल.
12जिची पिले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली पुरवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो.
13जो बर्याची फेड वाइटाने करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही.
14कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.
15दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा, ह्या दोघांचाही परमेश्वराला वीट येतो.
16मूर्खाला बुद्धी नसता ज्ञानाची खरेदी करण्यासाठी तो हाती द्रव्य का घेतो?
17मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.
18बुद्धिहीन मनुष्य आपल्या शेजार्यासमक्ष, हातावर हात मारून जामीन होतो.
19जो कलहप्रिय तो अपराधप्रिय असतो; जो आपले दार उंच करतो तो नाशाला आमंत्रण देतो.
20ज्याचे चित्त उन्मत्त असते त्याचे कल्याण होत नाही; ज्याची जिव्हा कुटिल असते तो विपत्तीत पडतो.
21मूर्खाला जन्म देतो तो दु:खाची जोड करतो; मूर्खाच्या बापाला आनंद नाही.
22आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय; खिन्न हृदय हाडे शुष्क करते.
23न्यायमार्ग विपरीत करण्यासाठी, दुर्जन गुप्तपणे लाच घेतो.
24जो समंजस असतो त्याच्या डोळ्यासमोर ज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटांकडे असतात.
25मूर्ख मुलगा आपल्या बापाला दु:ख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो.
26नीतिमानास दंड करणे व सरदारांना त्यांच्या सरळतेस्तव ताडन करणे योग्य नाही.
27जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो.
28मौन धारण करणार्या मूर्खालाही शहाणा समजतात; तो ओठ मिटून धरतो तेव्हा त्याला समंजस मानतात.
सध्या निवडलेले:
नीतिसूत्रे 17: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: