नीतिसूत्रे 18
18
1जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.
2मूर्खाला समंजसपणात संतोष वाटत नाही, तर केवळ आपल्या मनात जे काही आहे ते प्रकट करण्यातच त्याला संतोष वाटतो.
3जेथे दुष्ट तेथे तिरस्कार, आणि जेथे अधमता तेथे निंदा.
4मनुष्याच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत, ते वाहता ओढा व ज्ञानाचा झरा असे आहेत.
5दुर्जनाचा पक्ष धरून नीतिमानाचा न्याय विपरीत करणे उचित नाही.
6मूर्ख कलहाला तोंड देतो; त्याचे मुख चापटीला आमंत्रण करते.
7मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो. त्याची वाणी त्याच्या जिवाला पाश होय.
8कानास लागणार्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, ते अगदी खोल पोटात शिरतात.
9आपल्या कामात हयगय करणारा, नासधूस करणार्याचा भाऊ होय.
10परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो.
11धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे, त्याच्या मते ते उंच तटासारखे आहे.
12नाशापूर्वी मनुष्याचे अंत:करण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता.
13ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.
14मनुष्याचे चित्त आपली व्याधी सहन करते; पण व्याकूळ चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल?
15सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते; शहाण्याचे कान ज्ञानाविषयी आतुर असतात.
16लाच मनुष्याचा मार्ग मोकळा करते, व त्याला बड्या लोकांसमोर नेते.
17जो आपला दावा प्रथम मांडतो त्याचा पक्ष खरा भासतो, पण त्याचा शेजारी येऊन त्याला कसाला लावतो.
18चिठ्ठ्या टाकल्याने झगडे मिटतात, व झुंजार भिडण्याचे राहतात.
19दुखवलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे; कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरांसारखे होत.
20मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात; त्याला आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे.
21जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात.
22ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.
23निर्धन विनवण्या करतो, पण धनवान निष्ठुरपणाचे उत्तर देतो.
24जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.
सध्या निवडलेले:
नीतिसूत्रे 18: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: