YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 121

121
परमेश्वर तुझा रक्षक आहे
आरोहणस्तोत्र.
1मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो; मला साहाय्य कोठून येईल?
2आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते.
3तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही; तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही.
4पाहा, इस्राएलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही.
5परमेश्वर तुझा रक्षक आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे.
6दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही.
7परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जिवाचे रक्षण करील.
8परमेश्वर तुझे येणेजाणे येथून पुढे सर्वकाळ सुरक्षित करील.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 121: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन

YouVersion तुमच्या अनुभवाला वैयक्तिकृत करण्यासाठी कुकीज वापरते. आमची वेबसाइट वापरून, तुम्ही आमच्या कुकीजचा वापर करता आमच्या गोपनीयता धोरणात वर्णन केल्याप्रमाणे