स्तोत्रसंहिता 123
123
दयेची याचना
आरोहणस्तोत्र.
1हे स्वर्गात राजासनारूढ असणार्या, मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावतो.
2पाहा, जसे दासांचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात.
3हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर, आमच्यावर कृपा कर, कारण आमची पुरी नालस्ती होत आहे.
4सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 123: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.