YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 126

126
परत आणल्याबद्दल उपकारस्तुती
आरोहणस्तोत्र.
1सीयोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले, तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हांला वाटले.
2तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली, त्या समयी अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की, “परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.”
3परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत; त्यामुळे आम्हांला आनंद झाला आहे.
4हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्यांप्रमाणे आम्हांला बंदिवासातून परत आण.
5जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील.
6जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 126: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन