YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 15

15
देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी
दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
2जो सात्त्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो,
3आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजार्‍याची निंदा करीत नाही,
4अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणार्‍यांचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही,
5आपला पैसा वाढीदिढीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाच घेत नाही, तो; जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 15: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन