YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 21

21
शत्रूच्या तावडीतून सुटल्याबद्दल उपकारस्तुती
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो; तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्लास होतो!
2त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहेस, त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाहीस.
(सेला)
3कल्याणदायी वरदाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस. तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालतोस.
4त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले; तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस.
5तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो; तू त्याला प्रताप व महिमा ह्यांनी भूषित करतोस.
6त्याने सर्वकाळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस; तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस.
7कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे, परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही.
8तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील; तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील.
9तू प्रकट होशील तेव्हा तू त्यांना जळजळीत भट्टीसारखे पेटवशील; परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यांना ग्राशील, अग्नी त्यांचा संहार करील.
10त्यांची संतती पृथ्वीवरून व त्यांचे बीज मानवजातीतून तू नाहीसे करशील,
11कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतले; त्यांनी युक्ती योजली परंतु ती त्यांना साधायची नाही,
12कारण तू त्यांना पाठ दाखवण्यास लावशील, तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील.
13हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो; आम्ही गायनवादन करून तुझा पराक्रम वाखाणू.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 21: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन