YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 24

24
गौरवाचा राजा
दाविदाचे स्तोत्र.
1पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही परमेश्वराचे आहे; जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत.
2कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले.
3परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्रस्थानात कोण उभा राहील?
4ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, व कपटाने शपथ वाहत नाही तो.
5त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल.
6त्याला शरण जाणारे हेच लोक होत; हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच.
(सेला)
7अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा; पुरातन द्वारांनो, उंच व्हा; म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल.
8हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच.
9अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा; पुरातन द्वारांनो, उंच व्हा; म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल.
10हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा.
(सेला)

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 24: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन