YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 41

41
रोगनिवारणार्थ प्रार्थना
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्तोत्र.
1जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य! संकटसमयी परमेश्वर त्याला मुक्त करील.
2परमेश्वर त्याचे रक्षण करील. व त्याचा प्राण वाचवील; भूतलावर तो सुखी होईल, आणि तू त्याला त्याच्या वैर्‍यांच्या इच्छेवर सोडणार नाहीस.
3तो रोगाने अंथरुणास खिळला असता परमेश्वर त्याला सांभाळील; तो रोगी असता तू त्याचे अंथरूण बदलतोस.1
4मी म्हणालो, “हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर; माझ्या जिवाला बरे कर; मी तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.”
5माझे वैरी माझ्याविरुद्ध अभद्र बोलून म्हणतात की, “हा केव्हा मरेल आणि ह्याचे नावगाव केव्हा नाहीसे होईल?”
6त्यांच्यापैकी कोणी माझ्या समाचारास आला तर तो वरपांगी बोलतो; तो आपल्या मनात कुकल्पना साठवतो; आणि बाहेर जाऊन त्या सांगतो.
7माझे सर्व द्वेष्टे मिळून माझ्याविरुद्ध कुजबुज करतात आणि माझ्या अहिताच्या मसलती योजतात;
8“त्याला असाध्य रोग जडला आहे, तो पडला आहे, तो आता उठणार नाही” असे ते म्हणतात.
9जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे.
10हे परमेश्वरा, माझ्यावर दया करून मला उठव, म्हणजे मी त्यांचा बदला घेईन.
11माझा वैरी माझ्याविरुद्ध जयोत्सव करीत नाही, ह्यावरून तू माझ्यावर प्रसन्न आहेस असे मी समजतो.
12मला तर तू माझ्या सात्त्विकपणात स्थिर राखतोस, मला तू आपल्या सन्मुख सर्वकाळ ठेवतोस.
13इस्राएलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, आमेन.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 41: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन