YouVersion लोगो
सर्च आयकॉन

आमो. 4

4
1शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानाच्या #सुपीक जमीनगायींनो,
जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता,
जे तुम्ही गरजवंतांना ठेचता,
जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता,
“आण आणि आम्ही पीऊ.”
ते तुम्ही हे वचन ऐका.
2परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की,
पाहा, ते तुम्हास आकड्यांनी,
आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील,
असे दिवस तुम्हावर येतील.
3तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल,
तुम्ही आपणास हर्मोन पर्वतावर टाकाल,
असे परमेश्वर म्हणतो.
देवाच्या शिक्षेपासून बोध घेण्यात इस्त्राएलाची कसूर
4“बेथेलला जा आणि पाप करा,
गिलगालला जाऊन बहूतपट पापे करा,
तुम्ही रोज सकाळी आपले यज्ञ
आणि तीन वर्षांनी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा.
5खमिराच्या भाकरीने उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पण करा;
खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजवून घोषीत करा;
कारण हे इस्राएलाच्या लोकांनो,
हे करायला तुम्हास आवडते.”
असे परमेश्वर म्हणतो.
6“मी तुम्हास तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली
आणि तुमच्या सर्व स्थानांत भाकरीचा तोटा दिला,
तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.”
असे परमेश्वर म्हणतो.
7“कापणीला तीन महिने राहीले असता,
त्यावेळेस मी तुम्हापासून पाऊस आवरून धरला.
आणि मी एका शहरावर पाऊस पाडला
आणि दुसऱ्या शहरावर पाऊस पाडला नाही.
एका भागावर पाऊस पडला आणि ज्या भागावर
पाऊस पडला नाही तो सुकून गेला.
8म्हणून दोन्ही तिन्ही शहरातील लोक दुसऱ्या शहराकडे पाणी प्यायला धडपडत गेले.
परंतु तृप्त झाले नाहीत, तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत.”
असे परमेश्वर म्हणतो.
9“मी तुम्हास तांबेऱ्याने व भेरडाने पीडले आहे.
टोळांनी तुमच्या
बागांचा,
व द्राक्षमळ्यांचा,
व अंजिराच्या व जैतूनाच्या झाडांना फार खाऊन टाकले.
तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.”
असे परमेश्वर म्हणतो.
10“मिसरला पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली आहे.
तुमचे तरुण मी तलवारीने मारले आहेत,
आणि तुमचे घोडे पाडाव करून नेले आहेत,
तुमच्या छावण्यांचा दुर्गंध तुमच्या नाकपुडयात येईल असे केले आहे.
तरीसुध्दा तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.”
असे परमेश्वर म्हणतो. 11“सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला.
तसाच मी तुमच्यातील कित्येक शहरांचा नाश केला;
आगीत पटकन ओढून काढलेल्या जळक्या काटकीप्रमाणे तुमची स्थिती होती.
तरीही तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
12“म्हणून हे इस्राएला, मी तुझ्याबाबत असेच करीन,
आणि हे इस्राएला मी असे तुझ्याशी करेन तेव्हा,
इस्राएलाच्या परमेश्वरास भेटण्यास सज्ज हो.
13कारण पाहा, जो पर्वत निर्माण करतो व वारा अस्तित्वांत आणतो,
आणि मनुष्यास त्याची कल्पना काय ती प्रगट करतो,
जो पाहाटे अंधार करतो,
आणि पृथ्वीच्या उंच स्थानांवर चालतो.
त्याचे नाव परमेश्वर,
सेनाधीश देव आहे.”

सध्या निवडलेले:

आमो. 4: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन