मोशे इस्राएल लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी कोठे मिळाले नाही. तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नावाच्या ठिकाणी पोहोचले; तेथे पाणी फार कडू असल्यामुळे लोकांस ते पिववेना, म्हणूनच त्या ठिकाणाचे नाव मारा पडले. लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?” मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्यास एक वनस्पती दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्या वेळी परमेश्वराने इस्राएल लोकांस विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली. तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. मग ते एलीम येथे आले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला.
निर्ग. 15 वाचा
ऐका निर्ग. 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्ग. 15:22-27
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ