YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 15:22-27

निर्गम 15:22-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मोशे इस्राएल लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी कोठे मिळाले नाही. तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नावाच्या ठिकाणी पोहोचले; तेथे पाणी फार कडू असल्यामुळे लोकांस ते पिववेना, म्हणूनच त्या ठिकाणाचे नाव मारा पडले. लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?” मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्यास एक वनस्पती दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्या वेळी परमेश्वराने इस्राएल लोकांस विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली. तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. मग ते एलीम येथे आले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला.

सामायिक करा
निर्गम 15 वाचा

निर्गम 15:22-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग मोशेने इस्राएली लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे शूर नावाच्या रानात आणले. तीन दिवसांच्या रानातील त्यांच्या प्रवासात त्यांना पाणी मिळाले नाही. मग ते माराह येथे आले, त्याचे पाणी ते पिऊ शकले नाहीत, कारण ते कडू होते. (म्हणूनच त्या ठिकाणाला मारा, म्हणजे कडू असे म्हणतात.) “आम्ही काय प्यावे?” असे म्हणत लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली. तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने त्याला लाकडाचा एक तुकडा दाखविला. त्याने तो पाण्यात टाकला आणि पाणी पिण्यास योग्य झाले. त्या ठिकाणी याहवेहने त्यांना पारखण्यासाठी नियम व सूचना दिल्या. ते म्हणाले, “जर तुम्ही याहवेह, तुमच्या परमेश्वराचा शब्द काळजीपूर्वक ऐकाल व त्यांच्या नजरेत जे योग्य ते कराल, जर त्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊन त्यांचे सर्व नियम पाळाल, तर मी इजिप्तवर ज्या पीडा आणल्या होत्या, त्या तुमच्यावर आणणार नाही, कारण मी याहवेह, तुम्हाला आरोग्य देणारा आहे.” मग ते एलीम येथे आले. जिथे बारा झरे व सत्तर खजुरीची झाडे होती. त्या पाण्याजवळ त्यांनी तळ दिला.

सामायिक करा
निर्गम 15 वाचा

निर्गम 15:22-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर मोशेने इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहचले; त्या रानातून तीन दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले; तेथील पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा1 असे पडले. तेव्हा “आम्ही काय प्यावे?” असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. त्याने परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले, ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने2 त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला; त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले, “तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही; कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. मग ते एलीम येथे आले, तेथे पाण्याचे बारा झरे आणि खजुरीची सत्तर झाडे होती; तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला.

सामायिक करा
निर्गम 15 वाचा