ईयो. 34
34
देवाच्या न्याय्यत्वाचे अलीहू समर्थन करतो
1नंतर अलीहूने आपले बोलणे चालूच ठेवले तो म्हणाला,
2“शहाण्या मनुष्यांनो मी काय सांगतो ते ऐका
हुशार मनुष्यांनो, माझ्याकडे लक्ष द्या.
3तुमची जीभ ज्या अन्नाला स्पर्श करते त्याची चव तिला कळते
आणि तुमच्या कानांवर जे शब्द पडतात ते त्यांना पारखता येतात.
4तेव्हा आपण आता काय न्याय आहे ते निवडून घेवू
काय चांगले आहे ते आपण सगळ्यांनी बरोबर शिकू या.
5ईयोब म्हणतो, मी निष्पाप आहे,
आणि देव माझ्याबाबतीत न्यायी नाही.
6मी निरपराध आहे, परंतु माझ्याविरुध्द लागलेला निकाल मला खोटारडा ठरवतो
मी निरपराध असूनही मला खूप कष्ट भोगायला लागले.
7ईयोबासारखा आणखी कोणी आहे का?
जो निंदा पाण्याप्रमाणे प्राशन करतो.
8तो जे वाईट करतात त्यांच्याशी मैत्री करतो,
आणि त्यास दुष्टांबरोबर राहायला आवडते,
9तो असे म्हणतो, ते मनुष्याच्या कामाचे नाही,
जर देवाला खुश करायला लागला तर त्यास त्यापासून काहीही मिळणार नाही.
10तुम्हास समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका.
देव कधीही दुष्टाई करणार नाही.
तो सर्वशक्तिमान कधीच पाप करणार नाही.
11एखादा मनुष्य जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करीतो.
देव लोकांस त्यांच्या लायकीप्रमाणे देतो
12खरोखर, हे देव कधीच वाईट करीत नाही,
तो सर्वशक्तिमान कधीच न्यायाला विरोध करीत नाही.
13देवाला कोणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही.
सगळ्या जगाची काळजी देवावर कोणी सोपवली नाही.
14त्याचे चित्त स्वतःकडेच असते,
आणि त्याने आपला आत्मा आणि श्वास स्वतःच्या ठायी परत घेतला
15नंतर सर्व शरीरे एकत्रीत नाश पावतील
मनुष्य परत मातीस मिळेल.
16जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल
माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे
17जो मनुष्य न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही.
ईयोब, देव शक्तीमान आणि चांगला आहे. तू त्यास अपराधी ठरवू शकशील असे तुला वाटते का?
18एक देवच असा आहे जो राजांना तुम्ही कवडीमोलाचे आहात.
आणि ‘तुम्ही दुष्ट आहात.’ असे ज्ञान्यांना म्हणतो.
19देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही.
देव गरीब मनुष्यापेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही?
कारण ते सर्व त्याच्या हाताची कृती आहेत.
20माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात.
ते आजारी पडतात आणि मरतात.
अगदी शक्तीशाली लोकसुध्दा, कारण नसताना मरतात.
21लोक जे करतात ते देव बघतो
देव मनुष्याची प्रत्येक हालचाल बघत असतो.
22जगात कुठेही अशी अंधारी जागा नाही जिथे वाईट माणसे देवापासून लपून बसू शकतील.
23देवाला लोकांची अधिक परीक्षा घेण्यासाठी वेळ ठरवण्याची गरज नसते
लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांना समोर आणण्याची गरजही देवाला भासत नाही.
24शक्तीशाली लोकांचा तो चुराडा करतो, आणि त्यांच्या स्थानी दुसरा स्थापीतो,
त्यास त्यांना प्रश्न विचारण्याची गरज वाटत नाही.
25तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते.
म्हणूनच देव रात्रीतून दुष्टांना पराभव करतो आणि त्यांचा नि:पात करतो.
26वाईट मनुष्यांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल त्यांना शिक्षा करतो.
आणि जिथे इतर त्यांना पाहू शकतील अशा ठिकाणी देव त्यांना शिक्षा करतो.
27कारण वाईट मनुष्यांनी देवाची आज्ञा पाळायचे थांबवले
आणि देवाला हवे ते करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
28हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात.
दिनांची आरोळी त्याच्या कानी गेली.
29देव गरीबांची मदतीसाठी हाक ऐकतो. परंतु गरीबांना मदत करायची नाही असे देवाने ठरवले तरी देवाला कोणी अपराधी ठरवू शकणार नाही.
देवाने जर लोकांपासून लपून राहायचे असे ठरवले तर कोणालाही तो सापडू शकणार नाही
म्हणजे कोणीही लोकांस पिजंऱ्यात पकडू शकणार नाही.
30अशासाठी की, अधर्म्याचे राज्य येवू नये,
म्हणजे लोकांस कोणी जाळ्यात अडकवू नये.
31जर तो मनुष्य देवाला म्हणेल की.
मी अपराधी आहे. यापुढे मी पाप करणार नाही.
32जे मी बघू शकत नाही ते मला दाखव.
मी जरी पाप केले असेल तरी मी ते पुन्हा करणार नाही.
33तुला असे वाटते का देव त्या मनुष्याचा पापाला शिक्षा करील, देवाने आतापर्यंत केलेले तुला आवडले नाही?
हा तुझा निर्णय आहे. माझा नाही.
तुला काय वाटते ते मला सांग.
34शहाणा मनुष्य मला म्हणेल
खरोखर, प्रत्येक शहाणा मनुष्य जो माझे ऐकतो तो म्हणेल,
35‘ईयोब एखाद्या अज्ञानी मनुष्यासारखे बोलत आहे.
तो जे काही बोलतो ते अर्थहीन आहे.’
36जर फक्त ईयोबालाच त्याच्या वादाबद्दल कसोटीस लावत असू
कारण तो एखाद्या दुष्ट मनुष्यासारखे बोलत आहे.
37त्याच्या पापात त्याने आणखी बंडाची भर घातली आहे.
तो टाळी वाजवितो आमच्या मध्ये थट्टा करतो
देवाविरूद्ध अनेक शब्द बोलतो.”
सध्या निवडलेले:
ईयो. 34: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.