नहे. 12
12
याजक व लेवी
एज्रा 2:36-40
1शल्तीएलाचा पुत्र जरुब्बाबेल आणि येशूवा यांच्याबरोबर ते जे याजक आणि लेवी आले ते हे आहेतः सराया, यिर्मया, एज्रा, 2अमऱ्या, मल्लूख हत्तूश, 3शखन्या, रहूम मरेमोथ.
4इद्दो, गिन्नथोई, अबीया, 5मियामीन, माद्या, बिलगा, 6शमाया, योयारीब, यदया. 7सल्लू आमोक, हिल्कीया, यदया, हे लोक येशूवाच्या कारकिर्दीत, याजक आणि त्यांचे नातलग यांचे प्रमुख होते.
8लेवी असेः येशूवा, बिन्नुई, कदमीएल, शेरेब्या, यहूदा, आणि मत्तन्या, हे लोक तसेच मत्तन्याचे नातेवाईक देवाच्या स्तुती स्तोत्रांचे प्रमुख होते. 9बकबुक्या आणि उन्नी हे त्यांचे नातलग होते. देवाच्या स्तुतीस्तोत्रांच्या वेळी हे दोघे त्यांच्या पलीकडे उभे राहत.
10येशूवा योयाकीमचा पिता. योयाकीम एल्याशीबाचा जन्मदाता. एल्याशीबाचा पुत्र योयादा. 11योयादाने योनाथानाला जन्म दिला आणि योनाथानाने यद्दवाला.
12योयाकीमच्या काळात याजकांच्या घराण्यांचे मुख्य असलेले लोक पुढील प्रमाणे:सरायाच्या घराण्याचा प्रमुख मराया. यिर्मयाच्या घराण्याचा प्रमुख हनन्या 13एज्राच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम. अमऱ्याच्या घराण्याचा प्रमुख यहोहानान. 14मल्लूखीच्या घराण्याचा प्रमुख योनाथान शबन्याच्या घराण्याचा प्रमुख योसेफ.
15हारीमच्या घराण्याचा प्रमुख अदना. मरामोथच्या घराण्याचा प्रमुख हेलकइ. 16इद्दोच्या घराण्याचा प्रमुख जखऱ्या. गिन्नथोनच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम. 17अबीयाच्या घराण्याचा प्रमुख जिख्री. मिन्यामीन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय. 18बिलगाच्या घराण्याचा प्रमुख शम्मूवा शमायाच्या घराण्याचा प्रमुख यहोनाथान. 19योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तनय. यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी. 20सल्लू याच्या घराण्याचा प्रमुख कल्लय आमोकच्या घराण्याचा प्रमुख एबेर 21हिल्कीयाच्या घराण्याचा प्रमुख हशब्या यदयाच्या घराण्याचा प्रमुख नथनेल.
22एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या काळात जे लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारयावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत. 23लेवी घराण्यातील वंशजांच्या कुटुंबप्रमुखांची नावे एल्याशीबाचा पुत्र योहानान याच्या काळापर्यंत इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत.
24लेव्यांचे प्रमुख असे होतेः हशब्या, शेरेब्या, कदमीएलचा पुत्र येशूवा, आणि त्यांचे भाऊ देवाची गौरव गीते आणि स्तोत्रे गाण्यासाठी त्यांच्या पलीकडे उभे राहत. समूह समुहाने दाद देत कारण देवाचा मनुष्य दावीद याची तशीच आज्ञा होती. 25दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन अक्कूब, 26हे द्वारपाल योयाकीमच्या कारकिर्दीत सेवेत होते. योयाकीम हा येशूवाचा पुत्र आणि येशूवा योसादाकाचा. नहेम्या हा अधिकारी आणि एज्रा हा याजक व लेखक यांच्याच काळात द्वारपाल होते.
कोटाचे समर्पण
27यरूशलेमची तटबंदीची भिंत लोकांनी समर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरूशलेमेला एकत्र आणले. यरूशलेमची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावांहून आले. देवाची स्तुतीगीते आणि धन्यवादगीते गाण्यासाठी ते आले. त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली. 28शिवाय सर्व गायक देखील यरूशलेम भोवतालच्या नटोफाथी प्रांतातून यरूशलेमेला आले.
29नटोफा, बेथ-गिलगाल, गिबा आणि अजमावेथ ही ती गावे होत. यरूशलेम भोवतालच्या प्रदेशात या गायकांनी आपल्यासाठी ही छोटी गावे वसवली होती. 30नंतर याजक व लेवी यांनी समारंभपूर्वक स्वत:चे शुध्दीकरण केले. त्यानंतर त्यांनी बाकीचे लोक, वेशी, यरूशलेमची भिंत यांनाही शुद्ध करण्याचा समारंभ केला.
31यहूदाच्या नेत्यांना मी वर जाऊन तटबंदीवर थांबायला सांगितले आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी गायकांचे दोन मोठे वृंदही मी नेमले. त्यातील एक गट राखेच्या ढिगाच्या वेशीकडे उजवीकडे असलेल्या भिंतीवर गेला.
32होशया आणि यहूदाचे निम्मे अधिकारी त्यांच्या मागोमाग गेले, 33आणि अजऱ्या, एज्रा, मशुल्लाम, 34यहूदा, बन्यामीन, शमाया, यिर्मया हे ही त्यांच्या पाठोपाठ गेले. 35काही याजकांचे पुत्र त्यांच्यापाठोपाठ रणशिंग वाजवत भिंतीकडे निघाले. जखऱ्या देखील त्यांच्यामागे निघाला. आसाफाचा पुत्र जक्कूर, जक्कूरचा पुत्र मिखाया, मिखायाचा पुत्र मत्तन्या, मत्तन्याचा पुत्र शमाया, शमायाचा पुत्र योनाथान, योनाथानाचा पुत्र जखऱ्या.
36आसाफचे भाऊ म्हणजे शमाया, अजरेल, मिललई, गिललई, माई नथनेल, यहूदा, हनानी हे ही वाद्ये घेऊन निघाले. ही वाद्ये देवाचा मनुष्य दावीद याने केली होती. एज्रा हा लेखक त्यांच्यापुढे होता. 37झऱ्याच्या वेशीपाशी ते पोहोंचले. पायऱ्या चढून ते दावीदनगरापर्यंत गेले. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर ते होते. दावीदाच्या घरावरुन चालत जाऊन ते पाण्याच्या वेशीकडे गेले.
38स्तुती गाणाऱ्या गायकांचा दुसरा गट दुसऱ्या दिशेला, डावीकडे निघाला. भिंतीच्यावर ते पोहोचेपर्यंत मी त्यांच्या पाठोपाठ होतो. अर्धे लोकही त्यांच्या मागोमाग गेले. भटृयांच्या दुर्गावरुन ते रुंद कोटाकडे गेले. 39मग ते पुढील वेशींवरुन गेले. एफ्राईमाची वेस जुनी वेस, मत्स्यवेस. हनानेल बुरूज आणि हमया बुरूज यांच्यावरुन ते पुढे गेले. मेंढरांच्या वेशीपर्यंत जाऊन पहाऱ्याच्या वेशीजवळ ते थांबले.
40मग स्तुती गाणाऱ्या गायकांचे दोन्ही समूह देवाच्या मंदिरात आपापल्या जागी गेले. मी माझ्या जागी निम्म्या अधिकाऱ्यांसमवेत उभा राहिलो. अधिकाऱ्यांपैकी निम्म्यांनी मंदिरातील आपापल्या जागा घेतल्या. 41मग याजक आपापल्या जागी उभे राहिले: एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मिखाया, एल्योएनाई, जखऱ्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते. 42मग मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खीया, एलाम व एजेर हे याजक मंदिरात आपापल्या जागी उभे राहिले. मग यिज्रह्याच्या अधिपत्याखाली या दोन्ही गायक गटांनी गायनाला सुरुवात केली.
43या खास दिवशी याजकांनी बरेच यज्ञ केले आणि आनंदोत्सव केला, सर्वजण अतिशय आनंदात होते. कारण देवाने सर्वांना आनंदीत केले होते. स्त्रिया आणि बालकेसुध्दा अतिशय हर्षभरित झाली होती. दूरवरच्या लोकांसही यरूशलेम मधला आनंदाचा जल्लोष ऐकू येत होता.
याजक व लेवी ह्यांच्यासाठी तरतूद
44त्यादिवशी भांडार, अर्पणे, प्रथमफळे दशांश यांच्या कोठारांवर अर्पणे गोळा करण्यासाठी लोकांच्या नेमणुका केल्या. त्या अर्पणातील काही भाग याजक व लेवी यांच्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे होता. समोर उभ्या असलेल्या याजक व लेवी यांच्यासाठी यहूदातील लोकांनी आनंद केला. 45याजक आणि लेवी यांनी देवासाठी करायची ती सर्व कृत्ये केली. लोकांच्या शुद्धीकरणाचे विधी पार पाडले. दावीद आणि शलमोन यांच्या आज्ञेवरून गायक व द्वारपाल यांनी आपली कामगिरी बजावली.
46फार पूर्वी, दावीदाच्या आणि आसाफाच्या काळी गायकांचे प्रमुख नेमले होते आणि त्याच्याजवळ देवाची स्तुतीगीते आणि धन्यवादगीते होती. 47अशाप्रकारे जरुब्बाबेल आणि नहेम्या यांच्या काळात समस्त इस्राएली लोकांनी गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी रोजच्या रोज लागेल ते दिले. इतर लेव्यांसाठीही लोकांनी काही भाग बाजूला ठेवला. आणि अहरोनाच्या वंशजांसाठी लेव्यांनी काही भाग वेगळा ठेवला.
सध्या निवडलेले:
नहे. 12: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.