YouVersion लोगो
सर्च आयकॉन

नीति. 17

17
1एखाद्या घरात पूर्ण मेजवानीची मुबलकता असून त्यामध्ये संघर्ष असला तर
त्यापेक्षा कोरड्या भाकरीचा तुकडा शांतीने खाणे उत्तम आहे.
2शहाणा सेवक लज्जास्पद वागणाऱ्या मुलावर अधिकार चालवीन
आणि एका भावाप्रमाणे वतनाचा भागीदार होईल.
3चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात,
पण परमेश्वर हृदय शुध्द करतो.
4जो मनुष्य वाईट करतो तो दुष्ट वाणीला कान देऊन ऐकतो;
जे वाईट गोष्टी सांगतात ते लबाड लक्ष देऊन ऐकतो.
5जो कोणी गरीबांची थट्टा करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अपमान करतो,
आणि जो दुसऱ्याच्या आपत्तीने आनंदित होतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
6नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत,
आणि आईवडील आपल्या मुलांस वैभव आणतात.
7उत्कृष्ट बोलणे मूर्खास शोभत नाही;
तसेच राज्यकर्त्याला खोटे ओठ किती तरी कमी शोभतात.
8लाच देणाऱ्याच्या दृष्टीने ती जादूच्या खड्यांसारखी आहे;
जिकडे तो वळतो तिकडे तो यशस्वी होतो.
9जो कोणी एखाद्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करतो तो प्रेम शोधतो,
पण जो कोणी गत गोष्टी घोकत बसतो तो जवळच्या मित्रास अंतरतो.
10मूर्खाच्या मनात शंभर फटके ठसतात,
यापेक्षा निषेध बुद्धिमान मनुष्याच्या मनावर अधिक खोलवर ठसतो.
11वाईट मनुष्य केवळ बंड करायचे शोधतो,
म्हणून क्रूर निरोपे त्याच्याविरुध्द पाठवण्यात येईल.
12मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची भेट होण्यापेक्षा
जिचे पिल्ले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली बरी.
13जो कोणी बऱ्याची फेड वाईटाने करील,
त्याच्या घरातून वाईट कधी जाणार नाही.
14कोणीतरी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, तसे भांडणाला सुरवात होण्यासारखे आहे,
म्हणून भांडण होण्यापूर्वीच त्यापासून दूर निघून जा.
15जो कोणी दुष्टाला निर्दोष ठरवतो किंवा नीतिमानाला दोषी ठरवतो,
या दोन्ही लोकांचा परमेश्वरास तिटकारा आहे.
16मूर्खाला बुद्धी नसताना तो ज्ञानाविषयी शिक्षण घेण्यासाठी पैसा का देतो,
जेव्हा त्याची ते शिकण्याची क्षमता नाही?
17मित्र सर्व वेळी प्रीती करतो,
आणि भाऊ संकटाच्या वेळेसाठी जन्मला आहे.
18बुद्धिहीन मनुष्य वचनानी बांधला जातो,
आणि त्याच्या शेजाऱ्याच्या कर्जाला जबाबदार होतो.
19ज्याला भांडण प्रिय त्यास पाप प्रिय;
जो आपले दार उंच करतो तो हाड मोडण्यास कारण होतो#गर्वाचे भाषण करणारा विनाशास कारण होतो.
20ज्या मनुष्याचे हृदय कपटी असते त्यामध्ये काही चांगले सापडत नाही,
ज्या कोणाची जीभ वक्र असते तो संकटात पडतो.
21जो कोणी मूर्खाला जन्म देतो, तो स्वतःवर दुःख आणतो;
जो कोणी मूर्खाचा पिता असतो त्यास आनंद नाही.
22आनंदी हृदय हे चांगले औषध आहे.
पण तुटलेला आत्मा हाडे शुष्क करतो.
23न्यायाच्या मार्गाचा दुरुपयोग करण्यासाठी,
वाईट मनुष्य गुप्तपणे लाच स्वीकारतो,
24ज्या कोणाला समंजसपणा असतो त्याच्या मुखापुढे ज्ञान असते,
पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटाकडे असतात.
25मूर्ख मुलगा पित्याला दु:ख आहे,
आणि जिने त्यास जन्म दिला त्या स्त्रीला क्लेश असा आहे.
26नीतिमानाला शिक्षा करणे हे कधीही चांगले नाही;
किंवा प्रामाणिक अधिपतीस त्याच्या सरळपणामुळे मारणे चांगले नाही.
27जो कोणी मितभाषण करतो त्याच्याकडे ज्ञान असते,
आणि ज्याची वृत्ती शांत तो समजदार असतो.
28मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात;
जेव्हा तो त्याचे मुख बंद करतो, तेव्हा त्यास बुद्धिमान समजतात.

सध्या निवडलेले:

नीति. 17: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन