YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 122

122
यरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र
1आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते#माझे मित्र मला म्हणाले,
तेव्हा मला आनंद झाला.
2हे यरूशलेमे,
तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
3हे यरूशलेमे,
एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
4इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे,
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश,
परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
5कारण तेथे न्यायासने,
दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
6यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा!
तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
7तुझ्या कोटात शांती असो,
आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
8माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता,
मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
9परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता,
मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 122: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन