YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 123

123
दयेची याचना
1स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या,
तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.
2पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात,
जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात,
तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर
आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात.
3हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर,
कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.
4सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा,
आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी
आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 123: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन