YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 149

149
इस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश
1परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वरास नवे गीत गा;
विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
2इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो.
सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.
3ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत;
ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
4कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे;
तो दीनांना तारणाने गौरवितो.
5भक्त विजयाने हर्षभरित होवोत;
ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
6देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो,
आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
7यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा
आणि लोकांस शिक्षा करावी.
8ते त्यांच्या राजांना साखळंदडाने
आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.
9ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील.
हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे.
परमेश्वराची स्तुती करा.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 149: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन