YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 66

66
देवाच्या महत्कृत्यांबद्दल उपकारस्तुती
1अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा;
2त्याच्या नावाचा महिमा गा;
त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.
3देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत,
तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.
4सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील;
आणि तुझी स्तोत्रे गातील;
ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.
5अहो या, आणि देवाची कार्ये पहा;
तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो.
6त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली;
ते नदीतून पायांनी चालत गेले;
तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला.
7तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो;
तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो;
बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये.
8अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या,
आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा.
9तो आमचा जीव राखून ठेवतो,
आणि तो आमचे पाय सरकू देत नाही.
10कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे;
रुप्याची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे.
11तू आम्हास जाळ्यात आणले;
तू आमच्या कमरेवर अवजड ओझे ठेवले.
12तू आमच्या डोक्यावरून लोकांस स्वारी करण्यास लावले.
आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो,
परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले.
13मी होमार्पणे घेऊन तुझ्या घरात येईन;
मी तुला केलेले नवस फेडीन.
14संकटात असता जे मी आपल्या ओठांनी उच्चारले
आणि जे मी आपल्या तोंडाने बोलल,
15मी तुला मेंढ्याच्या धूपासहित
पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीण;
बोकड आणि गोऱ्हे अर्पीण.
16जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका,
आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो.
17मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला,
आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती.
18जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते,
तर प्रभूने माझे ऐकले नसते.
19पण देवाने खचित ऐकले आहे;
त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे.
20देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही,
किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 66: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन