1 करिंथ 13
13
प्रीती ही अधिक महान
1मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषा जरी बोलू शकलो आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. 2संदेश देण्याचे कृपादान जरी मला लाभलेले असले, सर्व रहस्ये व सर्व विद्या मला अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका माझा विश्वास दृढ असला आणि माझ्या मध्ये प्रीती नसली, तर मी शून्य आहे. 3मी माझे सर्व धन जरी अन्नदानार्थ दिले व माझे शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.
4प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, फुशारकी मारत नाही, गर्वाने फुगत नाही, 5ती सभ्यता सोडून वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; 6ती दुष्कृत्यात आनंद मानत नाही, तर सत्यात आनंद मानते. 7प्रीती सर्व गोष्टींत चिकाटी सोडत नाही आणि सर्व गोष्टींवर श्रद्धा ठेवते, सर्व गोष्टींत आशा बाळगते व सर्व गोष्टींत धीर कायम ठेवते.
8प्रीती शाश्वत स्वरूपाची आहे. परंतु संदेश असले, तरी ते कालबाह्य होतील. अपरिचित भाषांची कृपादाने असली, तरी त्यांना अंत आहे आणि विद्या असली, तरी ती संपुष्टात येईल; 9कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि आपल्याला अंशतः संदेश देता येतो. 10पण जे परिपूर्ण ते आल्यावर, अपूर्ण ते नष्ट होईल.
11मी मूल होतो, तेव्हा माझे बोलणे, माझ्या भावना व माझे विचार मुलासारखे असायचे. आता प्रौढ झाल्यावर मी बालिशपणा सोडून दिला आहे. 12ह्री आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते, ते अपूर्ण आहे. पण नंतर, मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे, मी पूर्णपणे ओळखीन.
13सारांश, विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यांत प्रीती अधिक महान आहे.
सध्या निवडलेले:
1 करिंथ 13: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: