YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र प्रस्तावना

प्रस्तावना
देवाचे निवडलेले लोक असे ज्यांना संबोधिले आहे, अशा ख्रिस्ती लोकांना पेत्राचे पहिले बोधपत्र लिहिण्यात आलेले आहे. हे लोक आशिया मायनरच्या उत्तरेकडे पांगलेले होते. ह्या लोकांचा त्यांच्या ख्रिस्ती श्रद्धेबद्दल छळ होत होता म्हणून त्यांना धीर व प्रोत्साहन देण्यासाठी प्रस्तुत बोधपत्र स्वतः पेत्राने लिहिले आहे. आपल्या वाचकांना येशूचे शुभवर्तमान, त्याची सहनशीलता, मरण, पुनरुत्थान व आश्वासित पुनरागमन यांचे स्मरण करून लेखक त्यांच्यामध्ये ख्रिस्ती आशेची ज्योत प्रज्वलित करतो. ह्या प्रकाशात त्यांनी त्यांचे दुःख म्हणजे अस्सल श्रद्धेची कसोटी आहे, असे समजून सहन करावे व त्यामुळे येशूच्या प्रकट होण्याच्या वेळी त्यांना मिळणाऱ्या शाश्वत पारितोषिकाविषयीचा त्यांचा आत्मविश्वास दृढ व्हावा, असे सुचविण्यात आले आहे.
ख्रिस्ती लोकांनी आपण ख्रिस्ताचे आहोत, हे भान राखून त्याच्यासारखे जीवन जगावे, असे आवाहनही प्रस्तुत बोधपत्राच्या शेवटी करण्यात आलेले आहे.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-2
परमेश्वराच्या तारणकार्याचे स्मरण 1:3-12
पवित्र जीवन जगण्यासाठी आवाहन 1:13-2:10
दुःखाला सामोरे जाताना 2:11-4:19
ख्रिस्ती नम्रता व सेवावृत्ती 5:1-11
समारोप 5:12-14

सध्या निवडलेले:

1 पेत्र प्रस्तावना: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन