YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 थेस्सल 1

1
शुभेच्छा व आभार
1देवपित्यामध्ये व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेली थेस्सलनीकाकरांची ख्रिस्तमंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून:
तुम्हांला कृपा व शांती मिळो.
2आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करीत तुम्हां सर्वांविषयी देवाचे सर्वदा आभार मानतो; 3कारण तुम्ही तुमची श्रद्धा कृतीत कशी उतरवीत आहात, तुमच्या प्रीतीमुळे तुम्ही कसे श्रम करीत आहात आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधील तुमची आशा कशी स्थिर आहे, ह्यांचे आम्ही देवपित्यासमोर निरंतर स्मरण करतो. 4आमच्या प्रिय बंधूंनो, देव तुमच्यावर प्रीती करतो व त्याने तुम्हांला त्याची प्रजा म्हणून निवडले आहे, हे आम्हांला ठाऊक आहे. 5आमचे शुभवर्तमान केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खातरीने तुम्हांला कळविण्यात आले. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो, हे तुम्हांला ठाऊक आहे. 6तुमचा छळ होत असतानाही तुम्ही देवाचा शद्ब पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन आनंदाने स्वीकारला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. 7अशाने मासेदोनिया व अखया येथील सर्व श्रद्धावंत ह्यांना तुम्ही आदर्श झालात. 8मासेदोनिया व अखया ह्या ठिकाणी तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वृत्तदेखील सर्वत्र पसरले आहे. ह्यामुळे त्याविषयी आम्हांला काही सांगावयाची गरज नाही. 9तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, याविषयी ते सर्व लोक बोलत आहेत. तसेच जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्याकरिता व 10त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्याकरिता तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळलात हे आपण होऊन ते तुमच्याविषयी सांगत आहेत. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यांतून उठविले व तो आपल्याला देवाच्या भावी क्रोधापासून वाचविणारा आहे.

सध्या निवडलेले:

1 थेस्सल 1: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन