1 तीमथ्य 3
3
ख्रिस्तमंडळ्यांचे नेतृत्व
1कोणी ख्रिस्तमंडळ्यांमध्ये बिशप होऊ पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन सत्य आहे. 2ख्रिस्तमंडळ्यांचा बिशप दोषरहित, एका स्त्रीचा पती, सौम्य, दक्ष, आत्मनियंत्रित, आदरणीय, अतिथिप्रिय व निपुण शिक्षक असा असावा. 3तो मद्यपी किंवा हिंसक नसावा, तर सौम्य, शांतिप्रिय, द्रव्यलोभ न धरणारा, 4आपल्या कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा व आपल्या मुलांबाळांना आज्ञाधारकपणाचे व भीडमर्यादेचे वळण लावणारा असावा; 5कारण ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळ्यांचा सांभाळ कसा करील? 6त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे त्याला दोषी ठरवले जाऊ नये म्हणून तो श्रद्धेत परिपक्व असावा. 7शिवाय त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये. त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांचे चांगले मत असावे,
8तसेच डीकन शीलवान व प्रामाणिक असावेत. दुतोंडे, मद्यपानासक्त व पैशाची हाव धरणारे नसावेत. 9ते विश्वासाचे रहस्य निर्मळ सदसद्विवेकबुद्धीने राखणारे असावेत. 10त्यांची अगोदर पारख व्हावी आणि ते निर्दोष सिद्ध झाले तर त्यांनी डीकन म्हणून सेवा करावी. 11तसेच त्यांच्या पत्नीही गंभीर असाव्यात, निंदक नसाव्यात, शांतचित्त व विश्वासू असाव्यात. 12ख्रिस्तमंडळीचा डीकन एका स्त्रीचा पती असावा. तो आपल्या मुलांबाळांची व कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा असावा. 13जे डीकन म्हणून चांगल्या प्रकारे सेवा करतात ते आपणासाठी चांगली योग्यता मिळवितात आणि ख्रिस्त येशूवरील श्रद्धेविषयी ते धैर्याने बोलू शकतात.
14तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून मी हे तुला लिहिले आहे. 15तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी देवाची ख्रिस्तमंडळी आहे तीत म्हणजे देवाच्या जिवंत घराण्यात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे. 16आपल्या धर्माचे रहस्य निर्विवाद मोठे आहे:
येशू देहात प्रकट झाला,
पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले
तो देवदूतांच्या दृष्टीस पडला,
त्याची यहुदीतर लोकांत घोषणा झाली,
जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो वर घेतला गेला.
सध्या निवडलेले:
1 तीमथ्य 3: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.