YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 करिंथ 3

3
नव्या कराराचे सेवक
1आम्ही पुन्हा स्वतःची वाखाणणी करू लागलो आहोत काय? अथवा जशी कित्येकांना लागतात तशी आम्हांला तुमच्यासाठी किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रे पाहिजेत काय? 2आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळावे व त्यांनी ते वाचावे, असे तुम्हीच आमचे पत्र आहात. 3स्वतः ख्रिस्ताने हे पत्र लिहिले असून आमच्याद्वारे ते तुमच्याकडे पाठविण्यात आले. हे पत्र शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने दगडी पाट्यांवर नव्हे तर मानवी हृदयावर लिहिलेले आहे.
4आम्हांला ख्रिस्ताद्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे म्हणून आम्ही असे म्हणतो. 5आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमची क्षमता देवाकडून आलेली आहे. 6त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी सक्षम केले. तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख ठार करतो, परंतु आत्मा जिवंत करतो.
शुभवर्तमानाचे तेजस्वी वैभव
7ज्याचा लेख दगडांवर कोरलेला असून ज्याचा शेवट मृत्यूत होत असे, ते सेवाकार्य एवढे तेजस्वी होते की, मोशेच्या मुखावरचे तेज नाहीसे होत चालले असतानाही इस्राएली लोकांना जर त्याच्या मुखाकडे टक लावून पाहवेना, 8तर आध्यात्मिक सेवाकार्य अधिक प्रमाणात तेजस्वी असणार नाही काय? 9ज्या व्यवस्थेचा परिणाम दंडाज्ञा, ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती अधिक तेजोमय असणार! 10इतकेच नव्हे, तर जे तेजस्वी होते ते ह्या अपरंपार तेजापुढे निस्तेज ठरले. 11अल्पावधीसाठी असलेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत आहे, ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार नाही का?
12आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो. 13इस्राएली लोकांनी जे निष्प्रभ होत होत नाहीसे होत चालले होते, ते तेज पाहू नये म्हणून मोशेने आपल्या मुखावर आच्छादन घातले होते, तसे आम्ही करत नाही. 14परंतु त्यांची मने खरोखर कठोर झाली आणि आजतागायत जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन तसेच न काढलेले आढळते. जेव्हा मनुष्य ख्रिस्ताशी जोडला जातो तेव्हा हे आच्छादन दूर केले जाते. 15आजदेखील जुना करार वाचून दाखविण्यात येतो, तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन असते. 16परंतु पवित्र शास्त्रात मोशेविषयी म्हटल्याप्रमाणे ते दूर केले जाऊ शकते:’तो प्रभूकडे वळला, तेव्हा त्याचे आच्छादन दूर करण्यात आले.’ 17येथे प्रभू म्हणजे पवित्र आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे, तेथे स्वातंत्र्य आहे. 18मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण, आरशातून प्रतिबिंबित होते त्याप्रमाणे प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करतो आणि पवित्र आत्म्याकडून येत असलेले हे वैभव आपल्याला प्रभूबरोबर अधिकाधिक एकरूप करीत आहे.

सध्या निवडलेले:

2 करिंथ 3: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन