2 करिंथ 4
4
प्रांजळपणे व धैर्याने शुभवर्तमानप्रचार
1आमच्यावर झालेल्या दयेनुसार हे सेवाकार्य आमच्याकडे सोपवण्यात आले आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. 2आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत. आम्ही फसवेगिरी करत नाही; देवाच्या वचनाचा विपर्यास होऊ न देता सत्य जाहीर करून प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीला देवासमक्ष आवाहन करतो; 3कारण आमचे शुभवर्तमान आच्छादिलेले असल्यास ज्यांचा नाश होत आहे, त्यांच्यासाठी ते आच्छादिलेले आहे. 4त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची तंतोतंत प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या वैभवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये. 5कारण आम्ही स्वतःची घोषणा करत नाही. तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशूसाठी आम्ही तुमचे सेवक आहोत, अशी घोषणा आम्ही करतो. 6अंधारातून उजेड प्रकाशित होईल, असे देव म्हणाला त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या वैभवशाली ज्ञानाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात पाडला आहे.
प्रेषितांची दुर्बलता व देवाचे सामर्थ्य
7तरीही आमचा आध्यात्मिक खजिना मातीच्या भांड्यात आहे, सामर्थ्याचा कळस देवामध्ये आहे, आमच्याकडे नाही, हे दाखविले जावे. 8आमच्यावर सर्व बाजूंनी संकटे आली, तरी आम्ही चिरडले गेलो नाही. आम्ही गोंधळलो, तरी निराश झालो नाही. 9आमचा छळ झाला, तरी आम्हांला टाकून देण्यात आले नाही. आमच्यावर प्रहार झाले, तरी आमचा विध्वंस झाला नाही. 10आम्ही येशूचा वध सर्वदा लक्षात ठेवतो ज्यामुळे येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट होते. 11येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे ह्यासाठी आमचे आयुष्य आम्ही येशूसाठी सदाचे मरणाच्या हाती सोपवलेले आहे. 12याचा अर्थ असा की, आमच्यामध्ये मरण, पण तुमच्यामध्ये जीवन कार्य करीत आहे.
13‘मी विश्वास धरला म्हणून बोललो,’ असा धर्मशास्त्रलेख आहे. त्याच श्रद्धामय वृत्तीने आम्हीदेखील विश्वास धरतो म्हणून बोलतो. 14आम्हांला हे ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला मरणातून उठविले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवून, तुमच्याबरोबर त्याच्या समक्षतेत नेईल. 15हे सर्व काही तुमच्याकरिता आहे आणि देवाची कृपा जशी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, तशी ते देवाच्या गौरवासाठी अधिक आभारप्रदर्शनात्मक प्रार्थना करतील.
क्षणिक दुःख पण शाश्वत वैभव
16म्हणूनच आम्ही धैर्य सोडत नाही. जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसागणिक नवा होत आहे 17आणि आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात शाश्वत गौरव आणील. 18आम्ही दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी शाश्वत आहेत.
सध्या निवडलेले:
2 करिंथ 4: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: