YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांना प्रस्तावना

प्रस्तावना
येशूविषयीचे शुभवर्तमान जसे पसरू लागले व जसे त्याचे स्वागत होऊ लागले तसे अनेक यहुदीतर लोक ख्रिस्ती होऊ लागले. अशा वेळी असा एक वाद उपस्थित झाला की, मोशेचे नियमशास्त्र पाळणे ख्रिस्ती माणसाकरिता बंधनकारक आहे की नाही. पौलाची असंदिग्ध भूमिका ही आहे की, मोशेचे नियमशास्त्र पाळणे ख्रिस्ती माणसाला बंधनकारक नाही. ख्रिस्ती जीवनाचा खरा पाया म्हणजे येशूवरील श्रद्धा होय. ह्या श्रद्धेमुळेच माणसाचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात. परंतु गलतीया येथील ख्रिस्तमंडळीमध्ये पौलाला ह्या बाबतीत विरोध करणारे लोक असा दावा करीत होते की, देवाबरोबर आपले संबंध यथायोग्य करण्यासाठी मोशेचे नियमशास्त्र पाळणे आवश्यक आहे.
प्रस्तुत बोधपत्र गलतीया येथील ख्रिस्ती लोकांना ह्या चुकीच्या शिकवणीपासून परावृत्त करण्याकरिता लिहिलेले आहे. पौल त्याच्या प्रेषितपदाविषयी स्पष्टीकरण देतो की, त्याला कोणत्याही मानवी अधिकाराने नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वराने यहुदीतर लोकांना शुभवर्तमान सांगण्यासाठी प्रेषित म्हणून नेमले आहे. त्यानंतर तो ‘तारण केवळ येशूवरील श्रद्धेने’ हा त्याचा मुख्य विचार विशद करून सांगतो. बोधपत्राच्या शेवटी पौल असे मार्गदर्शन करतो की, खरे ख्रिस्ती जीवन प्रेमपूर्ण असते व हे प्रेम ख्रिस्तावरील श्रद्धेने निर्माण होत असते.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-10
पौलाचा प्रेषित म्हणून अधिकार 1:11-2:21
परमेश्वराच्या कृपेचे शुभवर्तमान 3:1-4:31
ख्रिस्ती स्वतंत्रता व उत्तरदायित्व 5:1-6:10
समारोप 6:11-18

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन